डिजिटल मार्केटिंग कसे शिकावे? दहा मुद्दे समजून घ्या

digital marketing

Digital marketing: आजच्या युगात, कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी डिजिटल मार्केटिंग अत्यंत महत्त्वाचे झालं आहे. लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यवसायाला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणं गरजेचं झालं आहे. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये नवीन असाल आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर हा लेख तुमच्या साठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर चला, मग डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात करूया..

Digital marketing म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून उत्पादने किंवा सेवांचा प्रचार आणि विक्री करणे. यामध्ये विविध प्रकारच्या Online Platforms आणि Tools चा वापर केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही घरगूती मसाले तयार केलेत. त्याची विक्री तुम्ही प्रत्यक्ष बाजारात जाऊन करतात आणि दुसरा पर्याय म्हणून आँनलाईन पद्धतीने त्याची विक्री करू शकतात. फक्त घरगुती मसाले नाही तर तुम्ही कोणत्याही वस्तूची विक्री आँनलाईन पद्धतीने करू शकता. आता ती कशी करतात ?

उदाहरण:

गुगल Ads

सोशल मीडिया जाहिरात

ईमेल मार्केटिंग

वेबसाइट SEO

Digital marketing शिकण्याचे फायदे

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी

व्यवसायासाठी कमी खर्चात जास्त ग्राहक मिळवता येणे.

Freelancing आणि Remote जॉब्सची संधी.

स्वतःचा ब्रँड तयार करता येतो.

सतत बदलणाऱ्या बाजारपेठेत नवे कौशल्य.

 

Digital marketing शिकण्याची सुरुवात कशी करावी?

1. डिजिटल मार्केटिंगचे बेसिक ज्ञान समजून घ्या.

शिकण्याच्या सुरुवातीस डिजिटल मार्केटिंगचे प्रमुख भाग समजून घ्या:

SEO (Search Engine Optimization)

Content Marketing

Social Media Marketing

Email Marketing

Google Ads & Paid Marketing

Affiliate Marketing

Web Analytics

 

2. मोफत ऑनलाइन कोर्सेसद्वारे शिक्षण घ्या.

आज जगभरात अनेक वेबसाईट्सवर मोफत आणि दर्जेदार डिजिटल मार्केटिंग कोर्स उपलब्ध आहेत:

Google Digital Unlocked (Free)

HubSpot Academy (Free)

Coursera, Udemy (Paid/Free)

YouTube वर प्रॅक्टिकल मार्गदर्शन

 

3. स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग सुरू करा.

या गोष्टी प्रत्यक्ष शिकून अनुभव घेतल्यास लवकर फायदा होतो. कारण कोणत्याही गोष्टी स्वतः अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. तसंच डिजिटल मार्केटिंगचं देखील असचं आहे.

WordPress किंवा Blogger वर ब्लॉग तयार करा. यामध्ये तुम्ही वस्तूची संपूर्ण माहिती ग्राहकांना देऊन आकर्षित करण्यासाठी कामी येईल. सध्या लोकांचा ट्रेंड हा सोशल मीडियाकडे अधिक झुकला आहे. ते वापरण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे याठिकाणी तुम्ही वस्तूंची ब्रँडिंग केली तर त्याचा अधिक फायदा मिळू शकतो.

Google Analytics व Search Console वापरून Data Analysis शिकवा.

SEO आणि Content Writingचा सराव करा.

 

4. Social Media वर ब्रँड तयार करा.

डिजिटल मार्केटिंगमध्ये Social Media एक महत्त्वाचा भाग आहे.

Instagram, Facebook Page, LinkedIn Profile तयार करा.

Canva सारख्या tools ने Visual Content तयार करा.

Engagement वाढवण्याचे मार्ग शिकून घ्या.

5. Google Ads आणि Facebook Ads चालवून पहा.

Paid Marketing शिकण्यासाठी लहान बजेटमध्ये स्वतःची Ad मोहीम चालवा.

Google Ads चे बेसिक कॅम्पेन बनवा.

Facebook Business Suite वापरून Ad तयार करा.

Ad performance मोजण्यासाठी A/B टेस्टिंग करा.

6. Freelancing द्वारे प्रॅक्टिकल अनुभव घ्या.

शिकताना Part-Time Freelancing सुरू करा:

Fiverr, Upwork, Freelancer.com सारख्या साईट्सवर प्रोफाईल तयार करा.

लहान प्रोजेक्ट्स घेऊन अनुभव वाढवा.

Portfolio तयार करून क्लायंटसना आकर्षित करा.

7. केस स्टडी आणि Success Story वाचा.

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय यशस्वी कंपन्यांचे मार्केटिंग केस स्टडी वाचा.

Amazon, Zomato, Swiggy, Ola यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घ्या.

Trends वर लक्ष ठेवा..

 

Digital marketing

उदाहरणासह समजून घेऊ.

 

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणे. हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे आहे कारण यात आपण विशिष्ट लक्ष्य गटापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या प्रयत्नांचे परिणाम अचूकपणे मोजू शकतो. उदाहरणार्थ, ‘स्मार्ट स्टडी क्लासेस’ नावाचे एक कोचिंग सेंटर आहे, जे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणी देतात. त्यांना त्यांच्या सेवांची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. यासाठी ते डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करू शकतात, हे पाहूया:

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO): जेव्हा विद्यार्थी ‘ऑनलाइन ट्युशन क्लासेस’ किंवा ‘बेस्ट स्टडी मटेरियल’ असे गुगलवर शोधतील, तेव्हा ‘स्मार्ट स्टडी क्लासेस’ ची वेबसाइट पहिल्या काही निकालांमध्ये दिसली पाहिजे. यासाठी वेबसाइटवर योग्य कीवर्ड्सचा वापर करणे, दर्जेदार कंटेंट तयार करणे आणि इतर वेबसाइट्सवरून लिंक मिळवणे (लिंक बिल्डिंग) महत्त्वाचे आहे.

सोशल मीडिया मार्केटिंग (SMM): फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर ‘स्मार्ट स्टडी क्लासेस’ आपले आकर्षक पोस्टर्स, व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांच्या यशोगाथा शेअर करू शकतात. तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात आणि ऑनलाइन सेमिनार्स आयोजित करू शकतात. उदाहरणार्थ, दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स देणारा एक छोटा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करणे आणि विद्यार्थ्यांना लाईव्ह चर्चा सत्रात आमंत्रित करणे.

पेड ॲडव्हर्टायझिंग (Paid Advertising): कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘स्मार्ट स्टडी क्लासेस’ गुगल ॲड्स आणि फेसबुक ॲड्सचा वापर करू शकतात. ते विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील आणि विशिष्ट वयोगटातील (उदा. इयत्ता ८ ते १२ मधील विद्यार्थी) पालकांना लक्ष्य करू शकतात. यासाठी त्यांना त्यांच्या बजेटनुसार जाहिरात तयार करावी लागेल आणि त्याचे परिणाम नियमितपणे तपासावे लागतील.

कंटेंट मार्केटिंग (Content Marketing): ‘स्मार्ट स्टडी क्लासेस’ आपल्या वेबसाइटवर अभ्यास कसा करावा, परीक्षांची तयारी कशी करावी आणि करिअरच्या संधी यांसारख्या विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि ब्लॉग पोस्ट करू शकतात. हे वाचून संभाव्य ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतील आणि त्यांच्या सेवांची चौकशी करतील. उदाहरणार्थ, ‘बोर्ड परीक्षेत चांगले गुण कसे मिळवावेत’ यावर एक माहितीपूर्ण लेख वेबसाइटवर प्रकाशित करणे.

ईमेल मार्केटिंग (Email Marketing): ज्या पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर नोंदणी केली आहे, त्यांना नियमितपणे नवीन कोर्सेस, ऑफर्स आणि उपयुक्त टिप्स ईमेलद्वारे पाठवता येतात. यामुळे त्यांच्याशी सतत संपर्क राहतो आणि रूपांतरणाची (conversion) शक्यता वाढते.

या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की डिजिटल मार्केटिंगमध्ये विविध तंत्रांचा समावेश असतो आणि प्रत्येक तंत्र विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरले जाते. ‘स्मार्ट स्टडी क्लासेस’ या सर्व पद्धतींचा योग्य वापर करून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात आणि आपला व्यवसाय वाढवू शकतात. डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी या प्रत्येक तंत्राचा सखोल अभ्यास करणे आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेणे महत्त्वाचे आहे.

Digital marketing शिकून करिअरच्या संधी

Digital Marketing Executive

SEO Specialist

Content Marketer

Social Media Manager

PPC Specialist

Email Marketing Expert

Affiliate Marketer

डिजिटल मार्केटिंग हे फक्त थिअरी नाही, तर सरावाचा आणि सातत्याचा खेळ आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकल शिकत राहिलात, नवीन Trends जाणून घेतलात आणि प्रयोग केलेत, तर डिजिटल मार्केटिंग तुमच्यासाठी करिअरचा मजबूत पर्याय ठरू शकतो.

FAQ:

प्रश्न 1: डिजिटल मार्केटिंग शिकायला कोणती पात्रता लागते?

उत्तर: कुठलीही खास शैक्षणिक पात्रता नाही; इंटरनेट, इंग्रजी व सोशल मीडिया समजणे पुरेसे आहे.

प्रश्न 2: डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी किती खर्च येतो?

उत्तर: मोफत व सशुल्क दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीला मोफत कोर्सेस मधून सुरुवात करता येते.

प्रश्न 3: डिजिटल मार्केटिंग शिकून किती पगार मिळतो?

उत्तर: सुरुवातीला ₹10,000 ते ₹25,000 आणि अनुभव वाढल्यावर ₹50,000+ पर्यंत संधी मिळते.

पोरांनो तयारीला लागा..! १० हजार पदांची पोलीस भरती होणार, संपुर्ण माहिती

maharashtra police bharti 2025

Maharashtra Police Bharati 2025 : सरकारी नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं फार अवघड झालं आहे. यासाठी जे तरूण पोलिस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार आगामी २०२५ करीता फेब्रुवारी महिन्यानंतर १० हजार पदे भरणार आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून या भरतीसंदर्भात महत्वाचे संकेत दिले आहे.  या रिक्त १० हजार पदांची माहिती मागवण्यात आली असून पुढच्या महिन्यात यासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५

सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ देखील अपुरे पडतांना दिसत आहे. त्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेण्यात आला. यानुसार अपर पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षकांना याबाबत स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहे. यानुसार या पोलिस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणत: पावसाळ्यापुर्वी पुर्ण होईल, यादृष्टीने योग्य नियोजन सुरू असल्याचे समजत आहे.

रिक्त पद भरण्यासाठी सूचना :

अपर पोलिस महासंचालकांनी मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये रिक्त पदांची बिंदुनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे, राखीव पोलिस बलाकडील रिक्त पदांची माहिती संकलित करणे, याचा आढावा घेण्यात आला आहे. तशा प्रकारे सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

मागच्या पोलिस भरतीसाठी १७ हजार पोलिस पदांसाठी (Maharashtra Police Bharati 2025) संपुर्ण महाराष्ट्रातून जवळपास १८ लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले होते. यातच आता सोलापुर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापुर, सातार यासह इतर शहर-जिल्ह्यांची लोकसंख्या देखील वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात ३०६ MIDC आहेत. यासाठी देखील सुरक्षितता वाढवी, यासाठी उद्योजक मागणी करतांना दिसत आहेत. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नव्या पोलिस ठाणी स्थापन झाल्या आहेत. त्याकरिता देखील पोलिसांचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारिख – लवकरच जाहिर करण्यात येईल.

पदांचे नाव –

मागच्या वेळी पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डसमन, कारागृह शिपाई पदासाठी भरती घेण्यात आली होती. त्याआधारे खाली माहिती दिली आहे.

परिक्षा शुल्क : 

अनु.क्र.  पदाचे नाव  खुला प्रवर्ग मागासवर्गीय प्रवर्ग 
पोलिस शिपाई रू. ४५०/ रू. ३५०/
पोलिस शिपाई चालक रू. ४५०/ रू. ३५०/
सशस्त्र पोलिस शिपाई रू. ४५०/ रू. ३५०/
बॅण्डसमन रू. ४५०/ रू. ३५०/
कारागृह शिपाई रू. ४५०/ रू. ३५०/

 

अर्ज प्रक्रिया : ( Maharashtra Police Bharati 2025 )

  • पोलिस भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
  • सर्वप्रथम उमेदवारांना भरतीसंदर्भात लागणारी सर्व कागदपत्र स्वत: जवळ ठेवणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 करीता संबंधित वेबसाईटवर जाऊन लॉगिन करणे.
  • पोलीस भरतीसंदर्भात संपुर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे.
  • कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडणे.
  • आवश्यक सर्व माहिती योग्य भरणे, त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून परिक्षा फी भरणे.
  • अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जाची लगेचच प्रिंट काढून स्वत : जवळ ठेवणे.
  • अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे मैदाणी परीक्षा, तसेच इतर सर्व गोष्टींचे अपटेड मिळतील.
  • त्यानंतर आपला प्रवेश पत्र डाऊनलोड करून त्यांची प्रिंट आणि संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन परिक्षा केंद्रावर पोहचणे.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई या पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर  पोलीस बॅन्डस्मन करीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे.

महिला उमेदवारांकरीता पुरूष उमेदवारांकरीता तृतीय पंथी ( ट्रान्सजेंडर)
अ) उंची १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी. अ) स्वत: ची लिंक ओळख महिला/तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी – १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी.

ब) स्वत: ची लिंक ओळख पुरूष अशी केलेल्या व्यक्तींसाठी १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी.

ब) छाती न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी, व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा. स्वत: ची लिंग ओळख महिला/ पुरूष/तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही.

 

पोलीस भरतीची तयारी कशी करावी ? 

पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी पोलीस भरतीची मैदाणी चाचणी खूप महत्वाची असते. कारण या भरतीसाठी ५० गुणांची शारीरिक चाचणी फार आवश्यक असते. यामध्ये धावणे, गोळा फेकणे अशा काही कवायती असतात. यात पुरूषांसाठी १६०० मीटर तर महिलांसाठी ८०० मीटरसाठी २० गुण ठेवण्यात आले आहेत. तर १०० मीटरकरीता पुरूष आणि महिलांसाठी १५ गुण ठेवण्यात आले आहे. ज्यांनी वेळेत हे अंतर पार केले. तर त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यानंतर ते गुण हळूहळू कमी होत जातं.  याचसोबत गोळाफेककरीता पुरूष आणि महिलांसाठी १५ गुण ठेवण्यात आले आहे, म्हणजे मैदाणी चाचणीसाठी ५० गुण तर लेखी परिक्षा करीता १०० गुण ठेवण्यात आले आहे.

शारीरिक परीक्षा :

पुरूष महिला गुण 
धावणे १६०० मीटर 800 मीटर 20
धावणे १००  मीटर 100 मीटर 15
गोळाफेक 15
एकूण 50

 

लेखी चाचणी : शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये किमान ४० गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परिक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातात. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येणार आहे. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परिक्षा घेण्याबाबचा दिनांक निश्चित करण्यात येईल.

लेखी परिक्षाकरीता विषय :

अंकगणित :-  यामध्ये उमेदवारांकरीता संख्याप्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरळव्याज, सरासरी, लसावी-मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ, कोन, क्षेत्रफळावरील प्रश्न, चाकाच्या फेऱ्या. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यासाठी बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणताही एक पुस्तक व्यवस्थित घेऊन त्याचा सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.

सामान्य ज्ञान व चालु घडामोडी :- महाराष्ट्र, भारतातील ठिकाणं, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, ऐतिहासिक घटना, जगाचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नियुक्त्या, या बाबी व्यवस्थित वाचून गेल्यास जास्तीत जास्त गुण उमेदवारांना मिळण्याची दाट शक्यता असते.

बुद्धिमत्ता चाचणी :- यामध्ये प्रामुख्याने अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, बेन आकृती, नातेसंबंध, दिशा, कुटप्रश्न, व इतर घटकांचा समावेश केला जातो.

मराठी व्याकरण :-  मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, वर्णमाला, समास, संधी, विभक्ती, अलंकार, म्हणी, वाक्चप्रचार, शुद्धलेखन, समानार्थी-विरूद्धार्थी शब्द, तसेच व्याकरणाच्या इतर गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून गेल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

पोलिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • जन्म दाखला,
  • रहिवाशी प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • जात-वैधता प्रमाणपत्र
  • संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

टीप- पोलीस भरतीसाठी संबंधित उमेदवारांनी चांगली मेहनत करणे आवश्यक आहे. मैदाणी चाचणीसह लेखी परिक्षेची तयारी देखील महत्वाची आहे. याकरिता पोलीस भरतीसंदर्भात बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. ते वाचणे गरजेचे आहे. त्याचसोबत इतर चालू घडामोडीसाठी दररोज वर्तमान पेपर असो किंवा न्यूज पोर्टेलवर जाऊन माहिती घेणे महत्वाचे आहे.

पोलीस भरतीसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

१ ) महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ साठी जाहिरात कधी निघेल ?

  • अपर पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षकांना रिक्त पदांसंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात याभरतीसंदर्भात जाहिरात निघण्याची दाट शक्यता आहे.

२ ) या भरतीसाठी परीक्षा फी किती असणार ? 

२०२४ साली झालेल्या पोलीस भरतीसाठी खुला प्रवर्गासाठी ४५० तर मागासप्रवर्गासाठी ३५० रूपये फी ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदा देखील तेवढीच फी आकारण्यात येईल.