पोरांनो तयारीला लागा..! १० हजार पदांची पोलीस भरती होणार, संपुर्ण माहिती

maharashtra police bharti 2025

Maharashtra Police Bharati 2025 : सरकारी नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं फार अवघड झालं आहे. यासाठी जे तरूण पोलिस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार आगामी २०२५ करीता फेब्रुवारी महिन्यानंतर १० हजार पदे भरणार आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून या भरतीसंदर्भात महत्वाचे संकेत दिले आहे.  या रिक्त १० हजार पदांची माहिती मागवण्यात आली असून पुढच्या महिन्यात यासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५

सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ देखील अपुरे पडतांना दिसत आहे. त्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेण्यात आला. यानुसार अपर पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षकांना याबाबत स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहे. यानुसार या पोलिस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणत: पावसाळ्यापुर्वी पुर्ण होईल, यादृष्टीने योग्य नियोजन सुरू असल्याचे समजत आहे.

रिक्त पद भरण्यासाठी सूचना :

अपर पोलिस महासंचालकांनी मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये रिक्त पदांची बिंदुनामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदे, राखीव पोलिस बलाकडील रिक्त पदांची माहिती संकलित करणे, याचा आढावा घेण्यात आला आहे. तशा प्रकारे सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

मागच्या पोलिस भरतीसाठी १७ हजार पोलिस पदांसाठी (Maharashtra Police Bharati 2025) संपुर्ण महाराष्ट्रातून जवळपास १८ लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले होते. यातच आता सोलापुर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापुर, सातार यासह इतर शहर-जिल्ह्यांची लोकसंख्या देखील वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात ३०६ MIDC आहेत. यासाठी देखील सुरक्षितता वाढवी, यासाठी उद्योजक मागणी करतांना दिसत आहेत. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नव्या पोलिस ठाणी स्थापन झाल्या आहेत. त्याकरिता देखील पोलिसांचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारिख – लवकरच जाहिर करण्यात येईल.

पदांचे नाव –

मागच्या वेळी पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डसमन, कारागृह शिपाई पदासाठी भरती घेण्यात आली होती. त्याआधारे खाली माहिती दिली आहे.

परिक्षा शुल्क : 

अनु.क्र.  पदाचे नाव  खुला प्रवर्ग मागासवर्गीय प्रवर्ग 
पोलिस शिपाई रू. ४५०/ रू. ३५०/
पोलिस शिपाई चालक रू. ४५०/ रू. ३५०/
सशस्त्र पोलिस शिपाई रू. ४५०/ रू. ३५०/
बॅण्डसमन रू. ४५०/ रू. ३५०/
कारागृह शिपाई रू. ४५०/ रू. ३५०/

 

अर्ज प्रक्रिया : ( Maharashtra Police Bharati 2025 )

  • पोलिस भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
  • सर्वप्रथम उमेदवारांना भरतीसंदर्भात लागणारी सर्व कागदपत्र स्वत: जवळ ठेवणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 करीता संबंधित वेबसाईटवर जाऊन लॉगिन करणे.
  • पोलीस भरतीसंदर्भात संपुर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे.
  • कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडणे.
  • आवश्यक सर्व माहिती योग्य भरणे, त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून परिक्षा फी भरणे.
  • अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जाची लगेचच प्रिंट काढून स्वत : जवळ ठेवणे.
  • अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे मैदाणी परीक्षा, तसेच इतर सर्व गोष्टींचे अपटेड मिळतील.
  • त्यानंतर आपला प्रवेश पत्र डाऊनलोड करून त्यांची प्रिंट आणि संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन परिक्षा केंद्रावर पोहचणे.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई या पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर  पोलीस बॅन्डस्मन करीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे.

महिला उमेदवारांकरीता पुरूष उमेदवारांकरीता तृतीय पंथी ( ट्रान्सजेंडर)
अ) उंची १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी. अ) स्वत: ची लिंक ओळख महिला/तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी – १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी.

ब) स्वत: ची लिंक ओळख पुरूष अशी केलेल्या व्यक्तींसाठी १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी.

ब) छाती न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी, व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा. स्वत: ची लिंग ओळख महिला/ पुरूष/तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही.

 

पोलीस भरतीची तयारी कशी करावी ? 

पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी पोलीस भरतीची मैदाणी चाचणी खूप महत्वाची असते. कारण या भरतीसाठी ५० गुणांची शारीरिक चाचणी फार आवश्यक असते. यामध्ये धावणे, गोळा फेकणे अशा काही कवायती असतात. यात पुरूषांसाठी १६०० मीटर तर महिलांसाठी ८०० मीटरसाठी २० गुण ठेवण्यात आले आहेत. तर १०० मीटरकरीता पुरूष आणि महिलांसाठी १५ गुण ठेवण्यात आले आहे. ज्यांनी वेळेत हे अंतर पार केले. तर त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यानंतर ते गुण हळूहळू कमी होत जातं.  याचसोबत गोळाफेककरीता पुरूष आणि महिलांसाठी १५ गुण ठेवण्यात आले आहे, म्हणजे मैदाणी चाचणीसाठी ५० गुण तर लेखी परिक्षा करीता १०० गुण ठेवण्यात आले आहे.

शारीरिक परीक्षा :

पुरूष महिला गुण 
धावणे १६०० मीटर 800 मीटर 20
धावणे १००  मीटर 100 मीटर 15
गोळाफेक 15
एकूण 50

 

लेखी चाचणी : शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये किमान ४० गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परिक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातात. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येणार आहे. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परिक्षा घेण्याबाबचा दिनांक निश्चित करण्यात येईल.

लेखी परिक्षाकरीता विषय :

अंकगणित :-  यामध्ये उमेदवारांकरीता संख्याप्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरळव्याज, सरासरी, लसावी-मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ, कोन, क्षेत्रफळावरील प्रश्न, चाकाच्या फेऱ्या. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यासाठी बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणताही एक पुस्तक व्यवस्थित घेऊन त्याचा सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.

सामान्य ज्ञान व चालु घडामोडी :- महाराष्ट्र, भारतातील ठिकाणं, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, ऐतिहासिक घटना, जगाचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नियुक्त्या, या बाबी व्यवस्थित वाचून गेल्यास जास्तीत जास्त गुण उमेदवारांना मिळण्याची दाट शक्यता असते.

बुद्धिमत्ता चाचणी :- यामध्ये प्रामुख्याने अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, बेन आकृती, नातेसंबंध, दिशा, कुटप्रश्न, व इतर घटकांचा समावेश केला जातो.

मराठी व्याकरण :-  मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, वर्णमाला, समास, संधी, विभक्ती, अलंकार, म्हणी, वाक्चप्रचार, शुद्धलेखन, समानार्थी-विरूद्धार्थी शब्द, तसेच व्याकरणाच्या इतर गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून गेल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

पोलिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • जन्म दाखला,
  • रहिवाशी प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • जात-वैधता प्रमाणपत्र
  • संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

टीप- पोलीस भरतीसाठी संबंधित उमेदवारांनी चांगली मेहनत करणे आवश्यक आहे. मैदाणी चाचणीसह लेखी परिक्षेची तयारी देखील महत्वाची आहे. याकरिता पोलीस भरतीसंदर्भात बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. ते वाचणे गरजेचे आहे. त्याचसोबत इतर चालू घडामोडीसाठी दररोज वर्तमान पेपर असो किंवा न्यूज पोर्टेलवर जाऊन माहिती घेणे महत्वाचे आहे.

पोलीस भरतीसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

१ ) महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ साठी जाहिरात कधी निघेल ?

  • अपर पोलिस महासंचालक यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधिक्षकांना रिक्त पदांसंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात याभरतीसंदर्भात जाहिरात निघण्याची दाट शक्यता आहे.

२ ) या भरतीसाठी परीक्षा फी किती असणार ? 

२०२४ साली झालेल्या पोलीस भरतीसाठी खुला प्रवर्गासाठी ४५० तर मागासप्रवर्गासाठी ३५० रूपये फी ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदा देखील तेवढीच फी आकारण्यात येईल.

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२५ ..! पगार ५६ ,१०० प्रति महिना !

UPSC Exam 2025

UPSC Exam 2025 : यूपीएससी मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त असलेल्या 979 जागांसाठी आयएएस,आयपीएस, आयएफएस या पदांसाठी जाहिरात घोषित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ‘कोणतेही शाखेतील पदवी’ ही शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. तर या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला उमेदवारी अर्ज सादर दाखल करता येणार आहे. या भरतीची “पूर्व परीक्षा 25 मे 2025′ या तारखेला आयोजित करण्यात आली, तरीही इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र : 05/2025-CSP

एकूण जागा : 979 जागा

पदाचे नाव आणि तपशील 

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1. IAS, IPS, IFS आणि इतर 979  
       
       
  एकूण 979 जागा  
     

 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा: UPSC 2025

  • 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज प्रक्रिया : UPSC Exam 2025

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाच्या तारखा : UPSC Exam 2025

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2025 (06:00 PM)
  • परीक्षा (Online): 25 मे 2025
जाहिरात (PDF)  Click Here   
Online अर्ज  Click Here 
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

 

 टिप – “प्रथम UPSC Exam 2025 साठी तयारी करताना, योग्य अभ्यासक्रम समजून घ्या आणि वेळेचे नियोजन करा. परिणामी, अभ्यासाचे चांगले परिणाम दिसतील. सराव चाचण्या द्यायला विसरू नका. मात्र, वेळेचा अपव्यय टाळा आणि सामान्य चुका टाळण्याकडे लक्ष द्या. शेवटी, UPSC साठी चिकाटी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.”

मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती..! पगार २९,२०० प्रति महिना, आत्ताच उमेदवारी अर्ज सादर करा..

Bombay High Court Bharti 2025

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयात 221 जागांसाठी मेगा भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी फक्त शंभर रुपये फी असून नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पदवी तर आणि संगणक टायपिंग महत्त्वाची आहे. तरीही जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच उमेदवारी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

एकूण जागा :221 जागा

पदाचे नाव आणि तपशील 

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1. लिपिक (Clerk)  155  
2. विधी लिपिक (Law Clerk) 64  
       
  एकूण 221 जागा  
     

 

शैक्षणिक पात्रता : Mumbai High Court

पद क्रमांक : 1

  • (i) पदवीधर
  • (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)
  • (iii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्रमांक : 2

  • (i) 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M)
  • ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  •  

वयोमर्यादा:

पद क्रमांक : 1

  • 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्रमांक : 2

  • 10 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे

 

नोकरीचे ठिकाण : मुंबई, छत्रपती संभाजीनगर & नागपूर

परीक्षा शुल्क : पद क्रमांक : 1- ₹100/- पद क्रमांक : 2- ₹500/-

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (Online): एप्रिल,जून & सप्टेंबर 2025
जाहिरात (PDF) पद क्रमांक : 1  Click Here   पद क्रमांक : 2 Click Here
Online अर्ज  पद क्रमांक : १ Click Here  पद क्रमांक : 2 Click Here 
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

बालेवाडीत होणार “भव्य अटलसेवा महाआरोग्य शिबीर”, मंत्री, आमदार-खासदार देखील राहणार उपस्थित

Atalseva Mahaarogya Camp

 Atalseva Mahaarogya Camp : बालेवाडी : आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती असून निरोगी आयुष्य हेच माणसांच्या जीवनाचे खरी महत्व आहे. त्यामुळेच खर्जिक आजारांवरती उपचार हे पूर्ण:त मोफत मिळावे, असा संकल्प ठेऊन भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांनी भव्य अशा अटलसेवा महाआरोग्य’ शिबीराचं आयोजन केले आहे. लहू बालवडकर सोशल वेलफेअर व ‘सनराईस मेडिकल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबीराचं ( Atalseva Mahaarogya Camp ) आयोजन करण्यात आलं आहे. याचं आयोजन येत्या २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९ : ३० वाजेपासून सायंकाळी ०५ : ०० वाजेपर्यंत ‘बालेवाडी, हायस्ट्रीट ग्राऊंड पुणे” येथे करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी देखील पुर्ण झाली आहे.

अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे वैशिष्ट्ये

२४ जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रोजी तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी ‘अटल सेवा महाआरोग्य’ शिबीराचे ( Atalseva Mahaarogya Camp ) उद्घाटन होणार आहे. अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व तपासण्या आणि शस्त्रक्रिया अगदी मोफत होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ६० नामांकित रूग्णालय आणि तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.

तापसण्या, चाचण्या अगदी मोफत

जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने ३८ आजारांवरील रक्त चाचण्या ज्याला १५००० रूपये मोजावे लागतात. त्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत. यासह गुडघ्याचे तसेच मणक्याचे उपचार बिना शस्त्रक्रिया केली जाणारआहे. गुजरातमधील प्रसिध्द तज्ञ पन्नास डॉक्टारांच्या साह्याने प्राचीन निरोआयुर्वेदिक पद्धतीने खांदा दुखी, सांधेदुखी, खुबा शरीराच्या व्याधी शिबिरात कमी केल्या जाणार आहेत. मोफत चष्मे वाटप, मोफत औषध वाटप, कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र वाटप आदी तापसण्या, चाचण्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत.

शिबीरासाठी विविध नेते, मंत्र्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे महामंत्री राजेश पांडे, भाजपच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षा हर्षदा फरांदे, सरचिटणीस पुनीत जोशी, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष करण मिसाळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुमित भावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी २५ जानेवारीला उपस्थित राहणार आहेत. तर आमदार महेश लांडगे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष संजय काकडे, डिजिटल मिडया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, भाग संचालक सुभाष कदम २४ जानेवारीला आदी उपस्थित होणार आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला-पुरूष वर्ग, पत्रकार बंधु-भगिनी, विद्यार्थी, तरूण वर्ग, महिला बचत गट, सफाई कामगार वर्ग, महापालिका कर्मचारी वर्ग, तसेच पुण्यातील सर्व व्यक्तींनी या शिबीराला अवश्य भेट द्या. तसेच तुमच्या प्रत्येक आजारांवर याठिकाणी शस्त्रक्रिया, तपासण्या, चाचण्या, मार्गदर्शन, अगदी मोफत केल्या जाणार आहेत. आपल्याला ही आरोग्य क्रांती अशीच पुढे घेऊन जायची आहे आणि प्रत्येकांचं आयुष्य निरोगी ठेवायचं आहे. त्यामुळे सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्या. असे आवाहन लहु बालवडकर यांनी केले आहे.

भारतीय तटरक्षक दल भरती..! पगार २१,७०० रुपये प्रति महिना

Indian Coast Guard Bharti 2025

Coast Guard Bharti  : भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहीर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली असून नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. यासाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तर एप्रिल, जून आणि सप्टेंबर 2025 या महिन्यात या भरती संदर्भात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या सर्व भरती संदर्भात खाली माहिती दिली आहे. यात जाहिरात पीडीएफ ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत वेबसाईट देखील दिली आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी ही माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. जाहिरात क्र : CGEPT-02/2025

एकूण जागा : 300 जागा

पदाचे नाव आणि तपशील 

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1. नाविक (GD) 02/2025 बॅच 845  
2. नाविक (DB) 02/2025 बॅच 279  
       
  एकूण 300 जागा  
     

 

शैक्षणिक पात्रता : Coast Guard Bharti 

  • पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क :General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही] निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (Online): एप्रिल,जून & सप्टेंबर 2025
जाहिरात (PDF) Click Here 
Online अर्ज [Starting: 11 फेब्रुवारी 2025] Click Here 
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती..! पगार ५०,००० रुपये प्रति महिना

BHEL Bharti 2025

BHEL Bharti : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनिअर ट्रेनिंग आणि सुपरवायझर ट्रेनिंग या पदांसाठी 400 पद रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून त्यांनी त्यांना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या भरतीची परीक्षा 11 12 आणि 13 या तारखेला एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. तरीही इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

एकूण जागा : 400 जागा

पदाचे नाव आणि तपशील (BHEL Bharti)

 

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1. इंजिनिअर ट्रेनी 150  
2. सुपरवाइजर ट्रेनी 250  
       
  एकूण 400  
     

 

शैक्षणिक पात्रता : BHEL Bharti

पद क्र.1: B.E./B.Tech (Mechanical/Electrical/Civil/Electronics/Chemical/Metallurgy)

पद क्र.2: 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil/Electronics) [SC/ST: 60% गुण]

वयोमर्यादा:

  • 01 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 32 वर्षे दरम्यान असावे.
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क :General/OBC/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (Online): 11, 12 & 13 एप्रिल 2025
जाहिरात (PDF) Click Here 
Online अर्ज Click Here 
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती..! पगार ६९,१०० रुपये प्रति महिना

CISF Bharti 2025
CISF Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. यासाठी शारीरिक पात्रता देखील आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून खुला प्रवर्गासाठी 100 तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही. चार मार्च 2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. तर इच्छुक उमेदवारांना 3 फेब्रुवारी 2025 पासून या भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यासोबतच उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तसेच पीडीएफ खाली दिली आहे, ती व्यवस्थित वाचून घेणे महत्त्वाचे आहे. एकूण जागा : 1124 जागा पदाचे नाव आणि तपशील 
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1. कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 845
2. कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 279
एकूण 1124 जागा
 

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना शारीरिक पात्रता: प्रवर्ग उंची छाती General, SC & OBC
प्रवर्ग उंची छाती
General, SC & OBC 167 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST 160 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

वयोमर्यादा:

झोन बेस्ड ऑफिसर:
  • 04 मार्च 2025 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत परीक्षा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही] निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (Online): मार्च 2025
जाहिरात (PDF) Click Here 
Online अर्ज [Starting: 03 फेब्रुवारी 2025] Click Here 
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती..! पगार ४८,४८० रुपये प्रति महिना

CBI Bharati 2025

CBI Bharati 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. झोन बेस्ट ऑफिसर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ठेवण्यात आली आहे. अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी आणि हैदराबाद ही नोकरीची ठिकाणं असून इच्छुक उमेदवारांना 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तर या भरतीची परीक्षा मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या संदर्भात इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहितीची तपासणी करणे आवश्यक आहे.

एकूण जागा : 266 जागा

पदाचे नाव आणि तपशील (CBI Bharati 2025)

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1. झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I) 266  
       
       
  एकूण 266 जागा  
     

 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा:

झोन बेस्ड ऑफिसर:

  • 30 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 32 वर्षे दरम्यान असावे.
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद

परीक्षा शुल्क :  General/OBC/EWS: ₹850+GST [SC/ST/PWD/महिला: ₹175+GST]

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (Online): मार्च 2025
जाहिरात (PDF) Click Here 
Online अर्ज Click Here 
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

.. अखेर ‘आरोग्य मित्र’ बेमुदत संपावर जाणार..! कोणत्या आहेत मागण्या ?

Arogya Mitra

Arogya Mitra : नाशिक (प्रतिनिधी):- महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. सी.आय.टी.यु. संलग्न असलेल्या आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने दिनांक 18 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले. आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी किरण ढमढेरे यांनी एम. आर.टी.यू. आणि पी. यू. एल. पी. कायद्याचे कलम २४(१) मधील तरतुदीनुसार 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.

२१ दिवसाची मुदत

राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थांना कायदेशीर २१ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बे मदत काम बंद आंदोलन करणार आहेत. या अगोदर २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोग्यमित्र (Arogya Mitra) संघटनेने एक दिवसीय काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मुंबई एक दिवसीय आंदोलनासाठी गेले होते. त्यावेळी राज्य आरोग्य आम्ही सोसायटी आणि सहाय्य संस्था व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आरोग्य मित्राची पगार वाढ आणि इतर समस्यांची चर्चा झाली. सर्व चर्चा सकारात्मक झाली.

राज्य आरोग्य आम्ही सोसायटीने सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू. तसेच बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचे इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आले होते. आचारसंहिता संपून गेली नवीन सरकारचे देखील स्थापना झाली. तरी देखील राज्य आरोग्य हमी सोसायटीने आरोग्य मित्रांच्या मागण्याचा विचार केला नाही.

२२ डिसेंबर २०२४ रोजी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सिटी भावनात एक दिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्र व्यवहार करून आरोग्य मित्रांच्या मागण्यासाठी बैठकीची वेळेची मागणी केली. परंतु बैठकीसाठी कोणताही निरोप न आल्यामुळे आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी एम. आर. टी. यू आणि पी. यू. एल. पी. कायद्याच्या कलम २४ (१) मधील तरतूदीनुसार 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.

आरोग्य मित्राच्या मागण्या खालील प्रमाणे

  • आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार २६०००/- स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा.
  • दरवर्षी वेतन दहा टक्के पगार वाढ व्हावी
  • आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा.
  • आरोग्यमित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावे.
  • आरोग्यमित्राचे बदलीचे धोरण रद्द करावे.
  • आरोग्य मित्र रमेश पंडित बसणे आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे.
  • आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेने पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी होउनही उपदान दिले नाही ते देण्यात यावे.

युको बँक भरती..! पगार 48,480 रूपये प्रति महिना..!

Uco Bank Bharti 2025

Uco Bank Bharti : युको बँकेत 250 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता इच्छुक उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती खाली पीडीएफ च्या स्वरूपात देण्यात आली आहे . तरीही संबंधित उमेदवारांनी सर्व जाहिरात व इतर माहिती वाचूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्रमांक : HO/HRM/RECR/2024-25/COM-75

एकूण जागा : 250 जागा

पदाचे नाव आणि तपशील (Uco Bank Bharti )

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
लोकल बँक ऑफिसर (LBO) 250
     
  एकूण 250

 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

 

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.