मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. यातच भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडी तसेच महायुती मधील प्रमुख पक्षातील नेत्यांची उमेदवारांची यादी समोर आली नाही. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज ‘राज ठाकरे’ यांनी 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मुंबईतील माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आह. मागच्या वर्षी म्हणजे 2019 साली वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली देण्यात आली होती. ठाकरे घराण्यातील पहिलाच आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्या मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारांनी माघारी घेतली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोप्पा झाला होता. मात्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या विरोधात ठाकरे गट किंवा इतर कोण उमेदवार देणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघाचा दौरा केला. यामध्ये मराठवाड्यातील तसेच मुंबईतील मतदारसंघात राज ठाकरे यांनी उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये शिवडीत बाळा नांदगावकर, पंढरपुरात दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, हिंगोली विधानसभातून बंडू खुटे अशा उमेदवारांची राज ठाकरे यांनी याआधी घोषणा केली होती. काल कल्याण डोंबिवली मधून विद्यमान आमदार ‘राजू पाटील’ तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली होती. आज राज ठाकरे यांनी आपल्या अधिकच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती निवडणूकीच्या रिंगणात
ठाकरे घराण्यातील ‘अमित ठाकरे’ हे दुसरे व्यक्ती विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी माहीम हा मतदार संघ निवडला आहे. सुरुवातीला माहीम हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. या ठिकाणी महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे देखील इच्छुक आहेत. तर ठाकरे गटाकडून दोन व्यक्तींची नावे समोर येत आहेत यामध्ये माजी आमदार विशाखा राऊत आणि महेश सावंत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र मागच्या वर्षाप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावेळी अमित ठाकरे यांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार देणार का ? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी
- कल्याण ग्रामीण- राजू पाटील
- माहीम -अमित ठाकरे
- भांडुप पश्चिम -शिरीष सावंत
- वरळी -संदीप देशपांडे
- ठाणे शहर -अविनाश जाधव
- मुरबाड -संगीता चेंदवणकर
- कोथरूड -किशोर शिंदे
- हडपसर -साईनाथ बाबर
- खडकवासला -मयुरेश वांजळे
- मागाठाणा -नयन कदम
- बोरवली -कुणाल माईणकर
- दहिसर -राजेश वेरुणकर
- दिंडोशी -भास्कर परब
- वर्सोवा संदेश देसाई
- कांदिवली पूर्व -महेश फरकासे
- गोरेगाव -वीरेंद्र जाधव
- चारकोप -दिनेश साळवी
- जोगेश्वरी पूर्व -भालचंद्र अंभोरे
- विक्रोळी -विश्वजीत ढोलम
- घाटकोपर पश्चिम गणेश चुकाल
- घाटकोपर पूर्व -संदीप कुलथे
- चेंबूर -माऊली थोरवे,
- चांदिवली -महिंद्र भानुषाली
- मानखुर्द शिवाजीनगर जगदीश खांडेकर
- ऐरोली -निलेश वानखेडे
- बेलापूर गजानन काळे
- मुंब्रा कळवा -सुशांत सुरेराव
- नालासोपारा- विनोद मोरे
- भिवंडी पश्चिम -मनोज गुळवी
- मीरा-भाईंदर संदीप राणे
- शहापूर -हरिश्चंद्र खांडवी
- गुहागर -प्रमोद गांधी
- कर्जत जामखेड -रवींद्र कोठारी
- आष्टी -कैलास दरेकर
- गेवराई मयुरी -बाळासाहेब म्हस्के
- औसा -शिवकुमार नागराळे
- जळगाव शहर -अनुष पाटील
- वरोरा -परवीन सुर
- सोलापूर दक्षिण -महादेव कोगनुरे
- कागल रोहन निर्मळ
- तासगाव कवठेमहाकाळ -वैभव कुलकर्णी
- श्रीगोंदा -संजय शेळके
- हिंगणा -विजयराम किंकर
- नागपूर दक्षिण -आदित्य दुरुपकर
- सोलापूर शहर उत्तर -परशुराम इंगळे
मनसेने यापूर्वी जाहीर केलेले उमेदवार
- बाळा नांदगावकर -शिवडी
- दिलीप धोत्रे -पंढरपूर
- संतोष नागरगोजे-लातूर ग्रामीण
- बंडू कुठे- हिंगोली विधानसभा
- यवतमाळ -राजू उंबरकर
- राजूरा- सचिन भोयर
1 thought on “मनसेची पहिली यादी जाहीर ; अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात”