” फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं”, कॉंग्रेसच्या नेत्याची इच्छा

Spread love

Devendra Fadnavis : चंद्रपूर : खरं तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून आम्ही कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे पाहायचो आणि नंतर मुख्यमंत्री देखील झाले. आता आम्ही तुमच्याकडे कर्तृत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आणि हिमंत आहे. त्यामुळे आता तुम्ही (देवेंद्र फडणवीस) सुद्धा नरेंद्र मोदी यांचं वारसदार व्हावं, स्वाभाविक आहे. त्यात काही वेगळं नाही अशी स्तुतीसुमने माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली.

फडणवीस  चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची आज १२५ वी जयंती आहे. त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे किशोर जोरगेवार होते. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक सत्ताधारी आणि विरोधक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला माहिती आहे की फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच वडेट्टीवार आणि जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही वार असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहेत. त्यामुळे वार हे आडगाव आल्याबरोबर आमचे आमचे हात नेहमी पुढे असतात”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुनगंटीवार, वडेट्टीवार यांच्या नावाचा उल्लेख केला.

चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा

दरम्यान, या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला माहिती आहे की चंद्रपूर हा जिल्हा वाघ आणि वारांचा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच वडेट्टीवार आणि जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही वार असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहेत.


Spread love