Eknath Shinde : मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर काही उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज कायम ठेवली आहे. यामुळे मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. उद्यापासून राज्यात प्रचाराचा धुराळाला उडणार आहे. त्याआधी शिवसेना शिंदे गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार ठाकरेंची साथ सोडली. यातच विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा या 40 आमदारांना निवडून आणण्याची भाषा केली होती. यातील बहुतेक सगळ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर काही जणांचं तिकीट कापण्यात आलं आहे. अशातच राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 87 मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने उमेदवार उभे केले. यात काही मित्र पक्षांना मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी आता उद्यापासून प्रचाराचा धुरा उडणार आहे. यात 40 प्रचारक नेमण्यात आले आहे.
हेही वाचा…विधानसभेसाठी शिंदेंचे उमेदवार ठरले; ४५ उमेवारांची पहिली यादी जाहीर
शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली यात अनेक जुन्या नेत्यांसह नवीन नेत्यांना संधी देण्यात आले यात एकनाथ शिंदे यांच्या सह रामदास कदम गजानन कीर्तिकर आनंदराव अडसूळ प्रतापराव जाधव गुलाबराव पाटील अशा दिग्गज नेत्यांना नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे यासह काही नवख्या उमेदवारांना देखील स्टार प्रचारकतात कच्ची भूमिका सोपवल्या यामध्ये ज्योती वाघमारे शितल मात्रे राहुल लोंढे अशा अक्षय भोसले यांचा समावेश करण्यात आला
शिवसेना शिंदे गटातील स्टार प्रचारकांची यादी
- एकनाथ शिंदे,
- रामदास कदम
- गजानन कीर्तिकर
- आनंदराव अडसूळ
- प्रतापराव जाधव
- गुलाबराव पाटील
- नीलम गोरे
- मीनाताई कांबळे
- उदय सामंत
- शंभूराजे देसाई
- दीपक केसरकर
- तानाजी सावंत
- दादाजी भुसे
- संजय राठोड
- अब्दुल सत्तार
- भरत गोगावले
- संजय शिरसाठ
- श्रीकांत शिंदे
- धैर्यशीलराव माने
- नरेश मस्के
- श्रीरंग भरणे
- मिलिंद देवरा
- किरण पावसकर
- राहुल शेवाळे
- शरद पोंकशे
- मनीषा कायंदे
- गोविंदा अहुजा
- गोपाल तुमने
- दीपक सावंत
- आनंद जाधव
- ज्योती वाघमारे
- शितल म्हात्रे
- राहुल लोंढे
- हेमंत पाटील
- हेमंत गोडसे
- राजू वाघमारे
- मीनाक्षी शिंदे
- ज्योती मेहर
- अक्षय भोसले
- तेजस्विनी केंद्रेRead Also :
हेही वाचा…चंद्रकांतदादांनी शब्द दिला, म्हणजे तो शंभर टक्के पाळला जाणार
हेही वाचा…जरांगे पाटलांनी विधानसभेतून घेतली माघार, राजकीय दबाव होता का ?
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरूड पॅटर्न’ विजयश्रीकडे घेऊन जाणार ? प्रचारात घेतली मोठी आघाडी
हेही वाचा…”चंद्रकांतदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व”
हेही वाचा…अमोल बालवडकरांचा बंड थंड करण्यात भाजप यशस्वी ; चंद्रकांत पाटलांचा विजयाचा मार्ग मोकळा