indw vs irew odi : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा मानहाणीकारक पराभव झाल्यानं भारतीय क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने आग ओकत एकाच सीरीजमध्ये ३२ बळी टिपले. मात्र विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या खेळांडुची बँट चाललीच नाही. यातच अष्टपैलु खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांनी आपल्या पर्दापणात उकृष्ट खेळी साकारली. परंतु अन्य खेळाडूंना आपला खेळ दाखवला आला नाही. त्यामुळेच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यातच आता वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी कर्णधारलाच विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरूष क्रिकेट संघानं सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराक्षा केली आहे. मात्र महिला क्रिकेट संघ सध्या दमदार खेळ दाखवत आहे. यातच आता आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिला विश्रांती दिली आहे. कौर हिच्या सह गोलंदार रेणूका ठाकूरलाही विश्रांती देण्यात आली आहे.
स्मृती मानधनाकडे कर्णधार पद
बीसीसीआयने आगामी आयर्लंड यांच्याविरोधात वनडे मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका येत्या १० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने १५ खेळांडूंची घोषणा केली आहे. यातच कर्णधारला विश्रांती दिल्याने फलंदाज स्मृती मानधनाकडे कर्णधार पद येणार आहे. या व्यतिरिक्त भारताच्या संघात देखील मोठे बदल करण्यात आले आहेत.
अलिकडेच पार पडलेल्या टी-२० आणि वनडे मालिकेत भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिज सारख्या तगड्या संघाला मायदेशात पाणी पाजलं. या मालिकेत अनेक खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला. याच मालिकेत हरमनप्रीत कौरला दुखापत झाली होती. त्यामुळे कौरला काही सामन्यात विश्रांतीही देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कौरला विश्रांती दिली आहे.
आयर्लंडविरूद्धची वनडे मालिकाभारतीय महिला संघाला आयर्लंडच्या विरोधात अनुक्रमे १०,१२ आणि १५ जानेवारी रोजी वनडे सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व वनडे सामने राकोटमधील निरंजन शाह मैदानावर होणार असून सामन्याची वेळ ही भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होणार आहेत.
आयर्लंडविरूद्धची वनडे भारती महिला संघ
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हर्लिन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, उमा चेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कन्वर, तितास साधू , सायमा ठाकोर , सायली सातघरे’