Jarange Patil ; मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्य आधी राज्यात मोठ्या प्रमाणात वेगाने राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या म्हणून जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा केली आहे. विशेष करून काल म्हणून जरंग पाटील यांनी काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणा देखील केली होती. मात्र आज अचानक त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठ्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा…मनसेची पहिली यादी जाहीर ; अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात
मराठा आरक्षणावरून माहिती सरकारचे विरोधात आक्रमक भूमिका घेणारे म्हणून जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून बैठकांवर बैठका घेत होते. यामध्ये काही मराठा समाजासह इतर समाजातील नेत्यांनी देखील या बैठकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अशातच आज त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेतून केली. यात विशेष करून त्यांनी ‘एका जातीवरून निवडणूक लढणं शक्य नाही, त्यामुळे मराठा उमेदवारांनी अर्ज काढून घ्यावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कुणालाही पाडायला पाडा, ही म्हणणार नाही आणि कुणाला निवडून आणा, असे म्हणणार नाही. असे त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा..”महाराष्ट्रात गुलाबी वादळ घोंगवणार”; अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
यासह म्हणून जरांगे पाटील यांनी कोणतेही अपक्ष उमेदवाराला आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे. तसेच आमची माघार नाही तर आम्ही गमिनी कावा केला आहे. कोणत्याही दबावपोटी निर्णय घेतलेला नाही, आंदोलन सुरूच राहणार ते थांबणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यासह कोणत्या उमेदवारांनी मदत करणार असाल तर त्यांच्याकडून लिहून घ्या असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात पक्ष फुटी नंतर निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांनुसार अनेक मतदारसंघात बंडखोरी बघायला मिळाली. महायुती तसेच महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आता ही बंडखोरी क्षमा होण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करण्यासाठी करताना दिसत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून कोणत्या मतदारसंघात बंडखोर आपली उमेदवारी मागे घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also :
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरूड पॅटर्न’ विजयश्रीकडे घेऊन जाणार ? प्रचारात घेतली मोठी आघाडी
हेही वाचा…”चंद्रकांतदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व”
हेही वाचा…अमोल बालवडकरांचा बंड थंड करण्यात भाजप यशस्वी ; चंद्रकांत पाटलांचा विजयाचा मार्ग मोकळा
हेही वाचा…विधानसभेसाठी शिंदेंचे उमेदवार ठरले; ४५ उमेवारांची पहिली यादी जाहीर