कोल्हापुरातील उत्तर अन् दक्षिणमध्ये वादाची ठिणगी, भाजप अन् शिंदे गट आमनेसामने

Spread love

Kolhapur assembly constituencies : कोल्हापुर : महायुतीत अजूनही विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीय. परंतु त्याआधीच महायुतीत उमेदवारीवरून फटाके फुटतांना दिसत आहेत. यातच कोल्हापुर दक्षिणची जागा ही भाजपला जाणार हे निश्चित आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका या संभाव्य उमेदवार आहेत. परंतु उत्तर कृष्णराज यांच्या भूमिकेने वादाची ठिणगी पेटली आहे. याठिकाणी राजेश क्षीरसागर यांनी थेट दक्षिणमध्ये मेळावा घेऊन वणवा उठवला आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कुठंपर्यंत थांबतो, त्याची मतदारसंघात (Kolhapur assembly constituencies) चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये कोल्हापुर उत्तर व दक्षिणवरून (Kolhapur assembly constituencies ) सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. यातून खासदार धनंजय महाडिक विरूद्ध राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यातील वादाचा आता तोंड फुटलं आहे. यावर आता राजेश क्षीरसागर यांनी आपली भूमिका मांडली आहे. उत्तर तर जिंकणारच आहे, परंतु दक्षिणमध्ये देखील मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली आहे. दक्षिणचा जो भाग पुर्वी शिवसेनेचा मतदारसंघ राहिला आहे. त्याठिकाणी सेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीत सत्तेवर आली आहे. हे सांगायला कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही. असे म्हणत राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना टोला लगावला.

कोल्हापुर दक्षिण सेनेचा बालेकिल्ला 

कोल्हापुर (Kolhapur assembly constituencies) जिल्ह्यामध्ये शिवसेनेची वाढलेली ताकद ही निश्चितपणे मान्य करण्यायोग्य आहे. कारण लोकसभेला देखील शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय झाला होता. परंतु दक्षिण आणि उत्तरमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. कोल्हापुर शहर दक्षिण आणि शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उत्तर तर जिंकणारच, परंतु दक्षिणचा आमदार देखील आम्ही ठरवला आहे. १९९० पासून शिवसेना उत्तर तर लढवतेच, परंतु लोकसभा देखील लढवत आली आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेला संधी मिळालेली आहे. यातून विक्रमी मते ही शिवसेनेला मिळाली आहेत. आता उत्तर तसेच दक्षिणमध्ये वरिष्ठ जो योग्य निर्णय घेतील. त्याला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपला दिला इशारा 

वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, पण निश्चितपणे देश बळकट करण्यासाठी हिंदुत्वासाठी या ठिकाणी आम्ही काम करू. महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये,  यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील प्रचाराची सुरुवात केली. त्यावेळी माझं हेच म्हणणं होतं की. तत्कालीन शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीने टीका टिपणी केली गेली. त्यामुळे उमेदवाराला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न केला गेला. हा होऊ नये. कारण आम्ही सर्व सोडून आपल्या सोबत आलेलो आहोत. हे देखील त्यांनी माहिती पाहिजे. या ठिकाणी हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदुत्व यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. असं असताना शिवसेनेच्या उमेदवारांना डॅमेज करणं. हे थोडं चुकीचं. पण हे वरिष्ठ वरिष्ठ लेवलवर काही होत नाही.  स्थानिक जर कोणी या पद्धतीने वागत असेल तर निश्चितपणे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्वच पक्षाच्या माहितीच्या त्या ठिकाणी संयम ठेवला पाहिजे. असे म्हणत त्यांनी महाडिक यांना सुनावलं.

दक्षिणमध्ये नागरिकांचा सेनेला भरभरून प्रेम

निवडणुका येत असतात, जात असतात, वरिष्ठ निर्णय घेत असतात, मात्र मला खात्री आहे की, उत्तर तर शिवसेनेचा आमदार असणार पण दक्षिणेचा देखील आमदार शिवसैनिक ठरवणार का ?  एकंदरीत शिवसेना या पर्याय अतिशय चांगला याचे मिळवून दिसते.  आम्ही आमची चूक आहे. आज पण आम्ही दक्षिणेला लक्ष घेतला नव्हतं. पण दक्षिण मधल्या नागरिकांचे मतदारांच एवढं भरभरून आम्हाला प्रेम मिळतंय. ते लोकसभेमध्ये पण मी अनुभवलेला आहे.  असं असताना खऱ्या अर्थाने आमच्या हक्काचा आमचा बालेकिल्ला आहे. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. असे म्हणत त्यांनी दक्षिणेवर देखील दावा सांगितला आहे. 


Spread love

1 thought on “कोल्हापुरातील उत्तर अन् दक्षिणमध्ये वादाची ठिणगी, भाजप अन् शिंदे गट आमनेसामने”

Leave a Comment