आदिवासींसाठी कळवण प्रकल्पात विविध योजना मंजूर..! ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

government schemes

government schemes :  कळवण प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण जि. नाशिक यांचे कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी इच्छूक लाभार्थ्यांकडुन विविध योजनांचे मंजूर अर्ज (government schemes) मागविण्यात आले आहेत.  कळवण प्रकल्प कार्यक्षेत्रातील न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत मंजुर असलेल्या योजनांचे अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांची निवड करण्याकामी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्या अनुसूचित जमातीच्या इच्छूक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ (government schemes ) देण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत खालील गट अ (उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना)  व गट क ( (मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना) गटातील खालील योजनांसाठी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ च्या आत  ( सुट्टीचे दिवस वगळून ) प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक येथे अर्ज सादर करावेत.  सदर योजनांचा अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण व कार्यक्षेत्रातील तहसिल कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (government schemes)

खाली मंजूर योजनांची यादी दिली आहे.

गट अ (उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना) 

१) अनुसूचित जमातीच्या ग्रामिण भागातील MSRLM व माविम मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस विविध व्यवसाय करण्यासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

२) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85% अनुदानावर प्लॅस्टीक ताडपत्री, कॅरेट, सोपंप खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे

३)  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आटा चक्की (घरघंटी) खरेदी करण्यासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

४) अनुसूचित जमातीच्या महिला/पुरुषांना रसवंती व्यवसाय करण्यासाठी 85% अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे

५) अनुसूचित जमातीच्या दिव्यांग युवक-युवतींना विविध व्यवसाय करणेसाठी 85% अर्थसहाय्य करणे

६) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कातकरी व पारवी जमातीच्या कुटूंबाना विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे

७) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना व MSRLM मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस शेतात कीटक नियंत्रण करीता पीक संरक्षण यंत्र सौर स्वंयचलित प्रकाश सापळे खरेदी कामी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

८) प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्रातील सुरगाणा तालुक्यातील JL.G (संयुक्त दायित्व गट) गटांना मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये संगणक, प्रिंटर, दुद्याची डिग्री/फॅट तपासणी युनिट खरेदीसाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

९) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कावेरी कोंबडी कुकूट पालन उद्योग करण्याकामी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

१०) अनुसूचित जमातीच्या ग्रामिण भागातील MSRLM व मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस खेकडा पालनासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

११)  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85% अनुदानावर मासेमारी करण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे

गट क (मानव साधन संपत्ती विकासाच्या योजना व आदिवासी कल्याणात्मक योजना)

१ ) अनुसूचित जमातीच्या अपघातग्रस्त / नुकसाग्रस्त कुटूंबांच्या जवळ-च्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करणे.

२) अनुसूचित जमातीच्या बचत गटास बँन्डसंच पुरवठा करणे. आदिवासी ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमाकरीता भांडी संच पुरवठा करणे.

अटी व शर्ती :-

१) लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा,

२) जातीचा दाखला,

३) आधार कार्ड,

४) रेशन कार्ड,

५) लाभार्थ्यांचे राष्ट्रियकृत बैंक खाते पासबूक झेरॉक्स,

६) उत्पन्नाचा दाखला/दारीद्र्य रेषेचा दाखला (अलिकडील १ वर्षाच्या आतील)

७) अपंग, विधवा, परितक्त्या प्रमाणपत्र (असल्यास),

८) मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड

९) अलीकडील काळातील २ पासपोर्ट आकाराचे सुस्पष्ट फोटो

१०) आवश्यकतेनुसार 7/12 खाते उतारा व नमुना 8 चा उतारा

११) ग्रामसभेचा ठराव

१२) बचत गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र

या पूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र इ. आवश्यक कागदपत्र जोडावेत. तसेच अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज भरुन देण्यांची अंतिम मुदत ही दि.३० सप्टेंबर २०२४, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

प्रकल्प कार्यालयाकडून काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे

1) या कार्यालयात यापूर्वी सादर केलेला पात्र अपात्र अर्ज प्रतिक्षाधीन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

2) अर्जदाराने एखाद्या योजने करीता अर्ज केला म्हणजे तो त्या योजनेस पात्र झाला असे नाही.

3) अर्ज करतांना योजनेचे पूर्ण नाव टाकणे आवश्यक आहे, तसेच कागदपत्र परीपुर्ण असल्या शिवाय लाभ देय राहणार नाही.

4) लाभार्थ्यांची निवड करतांना प्रथम अपंग, विधवा, परितक्त्या, महिला, यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.