“महाराष्ट्रात गुलाबी वादळ घोंगवणार”; अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

ajit pawar group

Ajit Pawar : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचला आहे. यातच भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आज महायुतीमधील राष्ट्रवादी ‘अजित पवार’ गटातील सोळा विद्यमान आमदारांना एबी फॉर्म्सच वाटप आज मुंबईत करण्यात आ लं. यातच आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह पक्षातील सगळे वरिष्ठ नेते यांची म्हणजे जवळपास 27 स्टार प्रचारक यांची यादी जाहीर केली आहे. हे स्टार प्रचारक संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी प्रचार करतांना दिसणार आहे.

महायुतीत ५० पेक्षा अधिक जागा मिळणार ?

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर लागलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar)गटाचा फक्त एकच ‘खासदार’ निवडून आला. खुद्द बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी ‘सुनेत्रा पवार’ यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवार गटाला याचा मोठा धक्का बसला. आता हा सर्व पराभव विसरून अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवार गट महायुतीत असून त्यांना महायुतीकडून 50 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांची घोषणा उद्या किंवा परवा होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. त्याआधी अजित पवार गटाकडून काही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी

अजित पवार,

प्रफुल पटेल,

सुनील तटकरे

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

नरहरी झिरवळ

हसन मुश्रीफ

आदिती ताई तटकरे

नितीन पाटील

सयाजीराव शिंदे

अमोल मिटकरी

जलाउद्दीन सय्यद

धीरज शर्मा

रूपालीताई चाकणकर

इद्रिस नायकवडी

सुरज चव्हाण

कल्याण आखाडे

सुनील मगरे

महेश शिंदे

राजलक्ष्मी भोसले

सुरेखाताई ठाकरे

उदयकुमार आहेर

शशिकांत तरंगे

वासिम ब्रुहान

प्रशांत कदम

संध्या सोनवणे

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटातील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या दोन्ही बाजूंनी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.? त्यातच या निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांचं राजकीय भवितव्य देखील अवलंबून राहणार आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar)गटातील उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील ? त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

“मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही”, २८८ पैकी १९१ उमेदवार तयार ; महायुतीला थेट चँलेंज

Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Elections : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी राज्यात जय्यत तयारी करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु महायुती तसेच महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित होऊन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता महायुती मधील मित्रपक्ष असलेल्या ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या नेत्याने एक मोठं आणि धक्कादायक विधान केलंय.

महादेव जानकरांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ‘महादेव जानकर’ यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला महायुतीमधील पक्षाने विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कोणत्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलावलं”, नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। यासह महाविकास आघाडीमध्ये देखील सत्तेत जाणार नाही, आमचं काय होईल ? यासाठी आम्ही खंबीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासह आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळून नेतील, असा आरोप करत त्यामुळे आम्ही 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महायुती तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक

महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ नक्कीच खातं उघडेल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. यासह अजित पवारांची ‘बारामती’ देवेंद्र फडवणीस आणि विरोधात ‘नागपूर’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘कामठी’ या ठिकाणी महादेव जानकर प्रचारसभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात देखील कराडमध्ये महादेव जानकर प्रचार सभा घेणार आहेत. यासह ते एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात देखील राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी आमदार करणारा माणूस

सुरुवातीपासून राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीमध्ये अधिकच्या जागा द्याव्यात, अशी मागणी महादेव जानकर यांनी लावून धरली होती. परंतु महायुतीकडून महादेव जानकर यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही, यावरून मी या निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections) कोणालाही सोडणार नाही, काँग्रेस आणि भाजप आम्हाला समान अंतरावर ठेवलेले आहे. दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना खात आहे. मी आमदार करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे भीक मागत बसू का ? असं म्हणत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. यासह उद्याचं सरकार बनेल, त्यावेळी मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा देखील महादेव जानकर यांनी केलाय.

२३ नोव्हेंबरला लागणार विधानसभेचा निकाल

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. तर या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे. चार नोव्हेंबरला उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतो. त्यानंतर राज्यात कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार रिंगणात आहेत ? यावर शिक्कामोर्तब होईल. त्याआधी राज्यात प्रचाराचा जोरदार धुराळा उडणार आहे.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मोठा विजय मिळवला. राज्यातील 48 मतदार संघापैकी 31 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आलेत. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा करून महायुतीने राज्यात लोकांच्या बाबत सकारात्मक वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष ? सर्वात जास्त आमदार निवडून आणू शकतो आणि कोण मुख्यमंत्री होईल? याची प्रतीक्षा आता राज्यातील सगळ्याच लोकांना लागून राहिली आहे.

Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवार गटाची संभाव्य यादी जाहीर..!

Sharad Pawar

Sharad Pawar : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजून वाजून एक ते दोन दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्यापही भाजप सोडून इतर महत्त्वाच्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.  महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपामध्ये चर्चा सुरू आहे,  मात्र अद्यापही जागावाटपावर तोडगा निघालेला नाही.  उद्या किंवा कदाचित परवा या आघाडीमध्ये जागा वाटपावरवरील फॉर्मुला निश्चित होण्याची शक्यता आहे.  त्याच वेळी दोन्ही गटाकडून तसेच काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 39 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत 10 पैकी आठ जागांवर शरद पवार गटाने मोठा विजय मिळवला.  त्यांचा महाविकास आघाडी स्ट्राईक रेट देखील चांगला होता. तोच स्ट्राईक रेट विधानसभेत देखील चांगला राहावा,  यासाठी महाविकास आघाडी कडून कमीत कमी जास्त कमीत कमी जागा लढवून त्या निवडून आणणे, हे ध्येय शरद पवार गटाने ठेवण्यात आले आहे.  अशातच आता जे विद्यमान आमदार राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर शरद पवारांच्या सोबत राहिले आहेत.  त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी निश्चित झाली आहे. अलीकडे शरद पवार गटाची पार्लमेंटली पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली.  या बैठकीत काही नाव निश्चित करण्यात आले आहेत.  यामध्ये जयंत पाटील, जितेंद्रआव्हाड अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा, अशा विद्यमान आमदारांच्या नावांची यादी देखील तयार झाली आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी वाचा

जयंत पाटील – इस्लामपूर

जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा

अनिल देशमुख – काटोल

राजेश टोपे – घनसावंगी

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर

रोहित पवार – कर्जत जामखेड

प्राजक्त तनपुरे – राहुरी

रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

सुनील भुसारा – विक्रमगड

अशोक पवार – शिरुर

मानसिंग नाईक – शिराळा

शशिकांत शिंदे – कोरेगाव

संदीप क्षीरसागर – बीड

हर्षवर्धन पाटील – इंदापूर

राखी जाधव – घाटकोपर पूर्व

राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराडा

युगेंद्र पवार – बारामती

समरजित घाटगे – कागल

राणी लंके – पारनेर

रोहिणी खडसे – मुक्ताईनगर

प्रभाकर देशमुख- मान खटाव

दिलीप खोडपे -जामनेर

राजीव देशमुख -चाळीसगाव

अमित भांगरे -अकोले

प्रतापराव ढाकणे -पाथर्डी

दीपिका ताई चव्हाण- बागलाण

प्रशांत जगताप -हडपसर

सचिन दोडके -खडकवासला

देवदत्त निकम -आंबेगाव

उत्तमराव जानकर- माळशिरस

नंदाताई कुपेकर बाभुळकर -चंदगड

पृथ्वीराज साठे- केज विधानसभा

भाग्यश्री आश्रम- अहेरी

गुलाबराव देवकर आप्पा -जळगाव शहर

प्रदीप नाईक जाधव -किनवट

जयप्रकाश दांडेगावकर -वसमत

बाबा जाणीदुरानी -पाथरी

विजय भांबळे -जिंतूर

चंद्रकांत दानवे-भोकरदन

भाजपची पहिली यादी जाहीर..! विद्यमान आमदार देवयानी फरांदे अजूनही वेटिंग लिस्टवर

Devyani Farande

Devyani Farande : नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.  अशातच काल विधानसभेसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिकमधील नाशिक पूर्व मतदार संघात ‘राहुल ढिकले’ यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.  तर नाशिक पश्चिम या मतदार संघात ‘सीमाताई हिरे’ यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे.  मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार ‘देवयानी फरांदे’ (Devyani Farande) यांची उमेदवारी सध्या होल्डवर ठेवली आहे. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत नाशिक पुर्व मतदारसंघात अड राहुल ढिकाले, पश्चिम मध्ये सीमाताई हिरे, चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर, तर बागलाणमधून दिलीप बोरसे या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली होती. यातच नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर न करता विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. देवयानी फरांदे यांनी उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र अजुनही उमेदवारीवरून सस्पेंसन्स कायम राहिला आहे.

महाविकास आघाडीकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मागच्या २०१९ निवडणुकीत या मतदारसंघातून हेमलता पाटील यांनी निवडणूक लढवली होती. अलिकडेच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी हेमलता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर याच जागेसाठी कॉंग्रेसकडून १५ जण इच्छूक आहेत. यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कॉंग्रेसचे आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, शाहू खैरे, हनिफ बशीर. नितीन ठाकरे यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांनी देखील निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आघाडीत मागच्या वेळी ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र यंदा ही जागा नेमकी कुणाला मिळणार ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभेचा धुराळा उडाला..! भाजपची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी ?

Maharashtra Legislative Assembly(2)

Maharashtra Assembly Elections : मुंबई :  आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय यातच उमेदवार यांच्या घोषणांची प्रतीक्षा सगळ्यांना लागून राहिली होती.  आज भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता महायुतीमधील अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.  परंतु त्याआधी भाजपने पुन्हा एकदा दिग्गज उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात भाजपने मोठी आघाडी केले घेतली आहे.  आज भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अशा दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे.  तर दुसऱ्या बाजूला काही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय. यामध्ये चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या अश्विनी जगताप यांना डावलून शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांच्या कन्या दिग्विज्या चव्हाण यांना भोकरदन विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. मुंबईतील भाजपचे शहराध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवाजीनगर, कोथरूड आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवाजीनगर मतदार संघातून ‘सिद्धार्थ शिरोळे’ यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे.  पर्वती मधून विजयाचा चौकार मारण्यासाठी माधुरी मिसाळ पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला राजाचे  उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Assembly Elections) दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.  तर दौंड विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly Elections) राहुल कुल यांच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तेब केला आहे. भोसरी विधानसभा (Maharashtra Assembly Elections) मतदारसंघात महेश लांडगे यांच्यावर भाजपने पुन्हा विश्वास टाकला आहे.

भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी 

देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम

चंद्रशेखर बावनकुळे – कामठी,

राजेश उदयसिंह पाडवी – शहादा

विजयकुमार गावित- नंदूरबार,

अनुप अग्रवाल- धुळे शहर,

जयकुमार रावल-सिंदखेडा,

काशीराम पावरा- शिरपुर,

अमोल जावले-रावेर,

संजय सावकारे-भुसावळ,

सुरेश भोले-जळगाव शहर,

मंगेश चव्हाण-चाळीसगाव,

गिरीश महाजन-जामनेर,

श्वेता महाले- चिखली,

आकाश फुंडकर-खामगाव,

संजय कुटे-जळगाव (जामोद),

रणधीर सावरकर- अकोला पूर्व,

प्रताप अडसद-धामगाव रेल्वे,

प्रवीण तायडे-अचलपुर,

राजेश बकाने-देवळी,

समीर कणावर-हिंगणघाट,

पंकज भोयर-वर्धा,

समीर मेघे- हिंगना

मोहन माते- नागपूर दक्षिण,

कृष्ण खोपडे-नागपूर पुर्व,

विजय रहांगडाले-तिरोरा,

विनोद अग्रवालृ-गोंदिया,

संजय पुरम-अमगाव,

कृष्णा गजबे-आर्मोरी,

सुधीर मुनगंटीवार-बल्लापूर,

बंटी भांगडिया-चिमूर,

संजीवरेड्डी बोडकुरवार-वाणी

रालेगाव – अशोक उडके

यवतमाळ – मदन येरवर

किनवट – भीमराव केरम

भोकर – क्षीजया चव्हाण

नायगाव – राजेश पवार

मुखेड – तुषार राठोड

हिंगोली – तानाजी मुटकुले

जिंतूर – मेघना बोर्डीकर

परतूर – बबनराव लोणीकर

बदनापूर -नारायण कुचे

भोकरदन -संतोष दानवे

फुलंब्री – अनुराधा चव्हाण

औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

गंगापूर – प्रशांत बंब

बगलान – दिलीप बोरसे

चांदवड – राहुल अहेर

नाशिक पुर्व – राहुल ढिकाले

नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे

नालासोपारा – राजन नाईक

भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

मुरबाड – किसन कथोरे

कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड

डोंबिवली – रवींद्र चव्हाण

ठाणे – संजय केळकर

ऐरोली – गणेश नाईक

बेलापूर – मंदा म्हात्रे

दहिसर – मनीषा चौधरी

मुलुंड – मिहिर कोटेचा

कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर

चारकोप – योगेश सागर

मालाड पश्चिम – विनोद शेलार

गोरेगाव – विद्या ठाकूर

अंधेरी पश्चिम – अमित साटम

विले पार्ले – पराग अलवणी

घाटकोपर पश्चिम – राम कदम

वांद्रे पश्चिम – आशिष शेलार

सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन

वडाळा – कालिदास कोळंबकर

मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

कुलाबा – राहुल नार्वेकर

पनवेल – प्रशांत ठाकूर

उरन – महेश बाल्दी

दौंड- राहुल कुल

चिंचवड – शंकर जगताप

भोसरी -महेश लांडगे

शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

कोथरुड – चंद्रकांत पाटील

पर्वती – माधुरी मिसाळ

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

शेवगाव – मोनिका राजले

राहुरी शिवाजीराव कर्डिले

श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

कर्जत जामखेड – राम शिंदे

केज – नमिता मुंदडा

निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर

औसा – अभिमन्यू पवार

तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील

सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

मान -जयकुमार गोरे

कराड दक्षिण – अतुल भोसले

सातारा – शिवेंद्रराजे भोसले

कणकवली – नितेश राणे

कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक

इचलकरंजी – राहुल आवाडे

मिरज – सुरेश खाडे

सांगली – सुधीर गाडगीळ

महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला…! विधानसभा निवडणूकीत कोण मारणार बाजी?

Maharashtra Legislative Assembly(1)

Maharashtra Legislative Assembly : मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद होणार असून त्यात महाराष्ट्रासह झारखंड राज्यासाठी विधानसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर आजपासून राज्यात कदाचित आचारसंहिता लागू शकते. राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर पार पडलेल्या लोकसभेनंतर आता विधानसभा होत आहे. त्यामुळे या निवडणुकांची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा (Maharashtra Legislative Assembly) वेळापत्रक घोषणा आणि आचारसंहितेची घोषणा होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या निवडणुकांची घोषणा होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर रोजी तर झारखंड राज्याच्या विधानसभेची मुदत ५ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे आचारसंहिता किती दिवसाची असेल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

विधानसभेत कुणाचा बोलबाला ?

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर प्रथमच सहा प्रमुख पक्ष विधानसभेच्या रिंगणात आहेत. लोकसभेत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला. यामध्ये राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळवला तर महायुतीच्या वाट्याला केवळ १७ जागा आल्यात. आता राज्यात २८८ जागांसाठी विधानसभेची (Maharashtra Legislative Assembly) निवडणूक होत आहे. अजून कोणत्याही आघाडीत जागावाटप ठरलेला नाही. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच जागावाटप होणार असल्याचे बोललं जात आहे.

कोणता पक्ष आघाडीत, कोणता पक्ष स्वतंत्र? 

यातच उद्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीत सध्या कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटांसह इतर मित्र पक्ष आहेत. तर महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह इतर मित्र पक्ष देखील आहेत. यासह राज्यात या दोन आघाड्यांसह परिवर्तन महाशक्ती म्हणून तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजी राजे भोसले आहेत. तर मनसे आणि वंचित हे स्वतंत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

कोण मारणार बाजी ? 

यातच मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सुरूवातीला विधानसभा निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. मात्र त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार आणि कॉंग्रेस विरोध केला होता. दुसऱ्या बाजूला महायुतीत मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात येईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

कोल्हापुरातील उत्तर अन् दक्षिणमध्ये वादाची ठिणगी, भाजप अन् शिंदे गट आमनेसामने

Kolhapur assembly constituencies

Kolhapur assembly constituencies : कोल्हापुर : महायुतीत अजूनही विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीय. परंतु त्याआधीच महायुतीत उमेदवारीवरून फटाके फुटतांना दिसत आहेत. यातच कोल्हापुर दक्षिणची जागा ही भाजपला जाणार हे निश्चित आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका या संभाव्य उमेदवार आहेत. परंतु उत्तर कृष्णराज यांच्या भूमिकेने वादाची ठिणगी पेटली आहे. याठिकाणी राजेश क्षीरसागर यांनी थेट दक्षिणमध्ये मेळावा घेऊन वणवा उठवला आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कुठंपर्यंत थांबतो, त्याची मतदारसंघात (Kolhapur assembly constituencies) चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये कोल्हापुर उत्तर व दक्षिणवरून (Kolhapur assembly constituencies ) सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. यातून खासदार धनंजय महाडिक विरूद्ध राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यातील वादाचा आता तोंड फुटलं आहे. यावर आता राजेश क्षीरसागर यांनी आपली भूमिका मांडली आहे. उत्तर तर जिंकणारच आहे, परंतु दक्षिणमध्ये देखील मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली आहे. दक्षिणचा जो भाग पुर्वी शिवसेनेचा मतदारसंघ राहिला आहे. त्याठिकाणी सेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीत सत्तेवर आली आहे. हे सांगायला कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही. असे म्हणत राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना टोला लगावला.

कोल्हापुर दक्षिण सेनेचा बालेकिल्ला 

कोल्हापुर (Kolhapur assembly constituencies) जिल्ह्यामध्ये शिवसेनेची वाढलेली ताकद ही निश्चितपणे मान्य करण्यायोग्य आहे. कारण लोकसभेला देखील शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय झाला होता. परंतु दक्षिण आणि उत्तरमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. कोल्हापुर शहर दक्षिण आणि शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उत्तर तर जिंकणारच, परंतु दक्षिणचा आमदार देखील आम्ही ठरवला आहे. १९९० पासून शिवसेना उत्तर तर लढवतेच, परंतु लोकसभा देखील लढवत आली आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेला संधी मिळालेली आहे. यातून विक्रमी मते ही शिवसेनेला मिळाली आहेत. आता उत्तर तसेच दक्षिणमध्ये वरिष्ठ जो योग्य निर्णय घेतील. त्याला आमचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपला दिला इशारा 

वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, पण निश्चितपणे देश बळकट करण्यासाठी हिंदुत्वासाठी या ठिकाणी आम्ही काम करू. महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये,  यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील प्रचाराची सुरुवात केली. त्यावेळी माझं हेच म्हणणं होतं की. तत्कालीन शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीने टीका टिपणी केली गेली. त्यामुळे उमेदवाराला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न केला गेला. हा होऊ नये. कारण आम्ही सर्व सोडून आपल्या सोबत आलेलो आहोत. हे देखील त्यांनी माहिती पाहिजे. या ठिकाणी हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदुत्व यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. असं असताना शिवसेनेच्या उमेदवारांना डॅमेज करणं. हे थोडं चुकीचं. पण हे वरिष्ठ वरिष्ठ लेवलवर काही होत नाही.  स्थानिक जर कोणी या पद्धतीने वागत असेल तर निश्चितपणे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्वच पक्षाच्या माहितीच्या त्या ठिकाणी संयम ठेवला पाहिजे. असे म्हणत त्यांनी महाडिक यांना सुनावलं.

दक्षिणमध्ये नागरिकांचा सेनेला भरभरून प्रेम

निवडणुका येत असतात, जात असतात, वरिष्ठ निर्णय घेत असतात, मात्र मला खात्री आहे की, उत्तर तर शिवसेनेचा आमदार असणार पण दक्षिणेचा देखील आमदार शिवसैनिक ठरवणार का ?  एकंदरीत शिवसेना या पर्याय अतिशय चांगला याचे मिळवून दिसते.  आम्ही आमची चूक आहे. आज पण आम्ही दक्षिणेला लक्ष घेतला नव्हतं. पण दक्षिण मधल्या नागरिकांचे मतदारांच एवढं भरभरून आम्हाला प्रेम मिळतंय. ते लोकसभेमध्ये पण मी अनुभवलेला आहे.  असं असताना खऱ्या अर्थाने आमच्या हक्काचा आमचा बालेकिल्ला आहे. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. असे म्हणत त्यांनी दक्षिणेवर देखील दावा सांगितला आहे.