बालेवाडीत होणार “भव्य अटलसेवा महाआरोग्य शिबीर”, मंत्री, आमदार-खासदार देखील राहणार उपस्थित

Atalseva Mahaarogya Camp

 Atalseva Mahaarogya Camp : बालेवाडी : आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती असून निरोगी आयुष्य हेच माणसांच्या जीवनाचे खरी महत्व आहे. त्यामुळेच खर्जिक आजारांवरती उपचार हे पूर्ण:त मोफत मिळावे, असा संकल्प ठेऊन भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांनी भव्य अशा अटलसेवा महाआरोग्य’ शिबीराचं आयोजन केले आहे. लहू बालवडकर सोशल वेलफेअर व ‘सनराईस मेडिकल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबीराचं ( Atalseva Mahaarogya Camp ) आयोजन करण्यात आलं आहे. याचं आयोजन येत्या २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९ : ३० वाजेपासून सायंकाळी ०५ : ०० वाजेपर्यंत ‘बालेवाडी, हायस्ट्रीट ग्राऊंड पुणे” येथे करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी देखील पुर्ण झाली आहे.

अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे वैशिष्ट्ये

२४ जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रोजी तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी ‘अटल सेवा महाआरोग्य’ शिबीराचे ( Atalseva Mahaarogya Camp ) उद्घाटन होणार आहे. अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व तपासण्या आणि शस्त्रक्रिया अगदी मोफत होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ६० नामांकित रूग्णालय आणि तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.

तापसण्या, चाचण्या अगदी मोफत

जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने ३८ आजारांवरील रक्त चाचण्या ज्याला १५००० रूपये मोजावे लागतात. त्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत. यासह गुडघ्याचे तसेच मणक्याचे उपचार बिना शस्त्रक्रिया केली जाणारआहे. गुजरातमधील प्रसिध्द तज्ञ पन्नास डॉक्टारांच्या साह्याने प्राचीन निरोआयुर्वेदिक पद्धतीने खांदा दुखी, सांधेदुखी, खुबा शरीराच्या व्याधी शिबिरात कमी केल्या जाणार आहेत. मोफत चष्मे वाटप, मोफत औषध वाटप, कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र वाटप आदी तापसण्या, चाचण्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत.

शिबीरासाठी विविध नेते, मंत्र्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे महामंत्री राजेश पांडे, भाजपच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षा हर्षदा फरांदे, सरचिटणीस पुनीत जोशी, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष करण मिसाळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुमित भावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी २५ जानेवारीला उपस्थित राहणार आहेत. तर आमदार महेश लांडगे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष संजय काकडे, डिजिटल मिडया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, भाग संचालक सुभाष कदम २४ जानेवारीला आदी उपस्थित होणार आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला-पुरूष वर्ग, पत्रकार बंधु-भगिनी, विद्यार्थी, तरूण वर्ग, महिला बचत गट, सफाई कामगार वर्ग, महापालिका कर्मचारी वर्ग, तसेच पुण्यातील सर्व व्यक्तींनी या शिबीराला अवश्य भेट द्या. तसेच तुमच्या प्रत्येक आजारांवर याठिकाणी शस्त्रक्रिया, तपासण्या, चाचण्या, मार्गदर्शन, अगदी मोफत केल्या जाणार आहेत. आपल्याला ही आरोग्य क्रांती अशीच पुढे घेऊन जायची आहे आणि प्रत्येकांचं आयुष्य निरोगी ठेवायचं आहे. त्यामुळे सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्या. असे आवाहन लहु बालवडकर यांनी केले आहे.

“महाराष्ट्रात गुलाबी वादळ घोंगवणार”; अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

ajit pawar group

Ajit Pawar : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचला आहे. यातच भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आज महायुतीमधील राष्ट्रवादी ‘अजित पवार’ गटातील सोळा विद्यमान आमदारांना एबी फॉर्म्सच वाटप आज मुंबईत करण्यात आ लं. यातच आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह पक्षातील सगळे वरिष्ठ नेते यांची म्हणजे जवळपास 27 स्टार प्रचारक यांची यादी जाहीर केली आहे. हे स्टार प्रचारक संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी प्रचार करतांना दिसणार आहे.

महायुतीत ५० पेक्षा अधिक जागा मिळणार ?

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर लागलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar)गटाचा फक्त एकच ‘खासदार’ निवडून आला. खुद्द बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी ‘सुनेत्रा पवार’ यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवार गटाला याचा मोठा धक्का बसला. आता हा सर्व पराभव विसरून अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवार गट महायुतीत असून त्यांना महायुतीकडून 50 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांची घोषणा उद्या किंवा परवा होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. त्याआधी अजित पवार गटाकडून काही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी

अजित पवार,

प्रफुल पटेल,

सुनील तटकरे

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

नरहरी झिरवळ

हसन मुश्रीफ

आदिती ताई तटकरे

नितीन पाटील

सयाजीराव शिंदे

अमोल मिटकरी

जलाउद्दीन सय्यद

धीरज शर्मा

रूपालीताई चाकणकर

इद्रिस नायकवडी

सुरज चव्हाण

कल्याण आखाडे

सुनील मगरे

महेश शिंदे

राजलक्ष्मी भोसले

सुरेखाताई ठाकरे

उदयकुमार आहेर

शशिकांत तरंगे

वासिम ब्रुहान

प्रशांत कदम

संध्या सोनवणे

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटातील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या दोन्ही बाजूंनी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.? त्यातच या निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांचं राजकीय भवितव्य देखील अवलंबून राहणार आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar)गटातील उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील ? त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

“मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही”, २८८ पैकी १९१ उमेदवार तयार ; महायुतीला थेट चँलेंज

Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Elections : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी राज्यात जय्यत तयारी करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु महायुती तसेच महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित होऊन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता महायुती मधील मित्रपक्ष असलेल्या ‘राष्ट्रीय समाज पक्षा’च्या नेत्याने एक मोठं आणि धक्कादायक विधान केलंय.

महादेव जानकरांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ‘महादेव जानकर’ यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. “आम्हाला महायुतीमधील पक्षाने विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कोणत्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलावलं”, नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। यासह महाविकास आघाडीमध्ये देखील सत्तेत जाणार नाही, आमचं काय होईल ? यासाठी आम्ही खंबीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासह आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळून नेतील, असा आरोप करत त्यामुळे आम्ही 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महायुती तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक

महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ नक्कीच खातं उघडेल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. यासह अजित पवारांची ‘बारामती’ देवेंद्र फडवणीस आणि विरोधात ‘नागपूर’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘कामठी’ या ठिकाणी महादेव जानकर प्रचारसभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. महाविकास आघाडीतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात देखील कराडमध्ये महादेव जानकर प्रचार सभा घेणार आहेत. यासह ते एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात देखील राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी आमदार करणारा माणूस

सुरुवातीपासून राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीमध्ये अधिकच्या जागा द्याव्यात, अशी मागणी महादेव जानकर यांनी लावून धरली होती. परंतु महायुतीकडून महादेव जानकर यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही, यावरून मी या निवडणुकीतून (Maharashtra Assembly Elections) कोणालाही सोडणार नाही, काँग्रेस आणि भाजप आम्हाला समान अंतरावर ठेवलेले आहे. दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना खात आहे. मी आमदार करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे भीक मागत बसू का ? असं म्हणत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. यासह उद्याचं सरकार बनेल, त्यावेळी मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा देखील महादेव जानकर यांनी केलाय.

२३ नोव्हेंबरला लागणार विधानसभेचा निकाल

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. तर या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे. चार नोव्हेंबरला उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतो. त्यानंतर राज्यात कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार रिंगणात आहेत ? यावर शिक्कामोर्तब होईल. त्याआधी राज्यात प्रचाराचा जोरदार धुराळा उडणार आहे.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मोठा विजय मिळवला. राज्यातील 48 मतदार संघापैकी 31 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आलेत. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा करून महायुतीने राज्यात लोकांच्या बाबत सकारात्मक वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष ? सर्वात जास्त आमदार निवडून आणू शकतो आणि कोण मुख्यमंत्री होईल? याची प्रतीक्षा आता राज्यातील सगळ्याच लोकांना लागून राहिली आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर..! विद्यमान आमदार देवयानी फरांदे अजूनही वेटिंग लिस्टवर

Devyani Farande

Devyani Farande : नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.  अशातच काल विधानसभेसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिकमधील नाशिक पूर्व मतदार संघात ‘राहुल ढिकले’ यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.  तर नाशिक पश्चिम या मतदार संघात ‘सीमाताई हिरे’ यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला आहे.  मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार ‘देवयानी फरांदे’ (Devyani Farande) यांची उमेदवारी सध्या होल्डवर ठेवली आहे. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत नाशिक पुर्व मतदारसंघात अड राहुल ढिकाले, पश्चिम मध्ये सीमाताई हिरे, चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर, तर बागलाणमधून दिलीप बोरसे या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली होती. यातच नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर न करता विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. देवयानी फरांदे यांनी उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र अजुनही उमेदवारीवरून सस्पेंसन्स कायम राहिला आहे.

महाविकास आघाडीकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मागच्या २०१९ निवडणुकीत या मतदारसंघातून हेमलता पाटील यांनी निवडणूक लढवली होती. अलिकडेच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी हेमलता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर याच जागेसाठी कॉंग्रेसकडून १५ जण इच्छूक आहेत. यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कॉंग्रेसचे आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, शाहू खैरे, हनिफ बशीर. नितीन ठाकरे यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांनी देखील निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आघाडीत मागच्या वेळी ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र यंदा ही जागा नेमकी कुणाला मिळणार ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला…! विधानसभा निवडणूकीत कोण मारणार बाजी?

Maharashtra Legislative Assembly(1)

Maharashtra Legislative Assembly : मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद होणार असून त्यात महाराष्ट्रासह झारखंड राज्यासाठी विधानसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर आजपासून राज्यात कदाचित आचारसंहिता लागू शकते. राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर पार पडलेल्या लोकसभेनंतर आता विधानसभा होत आहे. त्यामुळे या निवडणुकांची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा (Maharashtra Legislative Assembly) वेळापत्रक घोषणा आणि आचारसंहितेची घोषणा होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या निवडणुकांची घोषणा होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर रोजी तर झारखंड राज्याच्या विधानसभेची मुदत ५ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे आचारसंहिता किती दिवसाची असेल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

विधानसभेत कुणाचा बोलबाला ?

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर प्रथमच सहा प्रमुख पक्ष विधानसभेच्या रिंगणात आहेत. लोकसभेत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला. यामध्ये राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळवला तर महायुतीच्या वाट्याला केवळ १७ जागा आल्यात. आता राज्यात २८८ जागांसाठी विधानसभेची (Maharashtra Legislative Assembly) निवडणूक होत आहे. अजून कोणत्याही आघाडीत जागावाटप ठरलेला नाही. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच जागावाटप होणार असल्याचे बोललं जात आहे.

कोणता पक्ष आघाडीत, कोणता पक्ष स्वतंत्र? 

यातच उद्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीत सध्या कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटांसह इतर मित्र पक्ष आहेत. तर महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह इतर मित्र पक्ष देखील आहेत. यासह राज्यात या दोन आघाड्यांसह परिवर्तन महाशक्ती म्हणून तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजी राजे भोसले आहेत. तर मनसे आणि वंचित हे स्वतंत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

कोण मारणार बाजी ? 

यातच मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सुरूवातीला विधानसभा निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. मात्र त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार आणि कॉंग्रेस विरोध केला होता. दुसऱ्या बाजूला महायुतीत मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात येईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.