Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपुर्ण माहिती

Mukhyamantri Annapurna Yojana online Apply

प्रस्तावना : Mukhyamantri Annapurna Yojana online Apply : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अनेक महत्वपुर्व योजना सुरू केल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२३ ते २०२४ या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा केली आहे. या याजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक मागास असलेल्या पाच कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आहे. या योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे. योजनेसाठी अर्ज कसा करायचा, याचा नेमका कुणाला फायदा होतो? तसेच या योजनेची सर्व प्रक्रिया यामधून तुम्हाला देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची (Mukhyamantri Annapurna Yojana) सुरूवात महाराष्ट्रात राज्य सरकारकडून २८ जून २०२४ पासून करण्यात आली आहे. या योजनेचा पुर्ण नाव मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना असं आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. केंद्र सरकारने सुरूवात केलेल्या उज्वला योजनेतून प्रेरित होऊन राज्य सरकारने या योजनेसाठी ५२.१६ लाख परिवारांसाठी ही योजना सुरू केली आहे.

या सोबत मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या पात्र महिलांना प्रत्येक वर्ष तीन गॅस सिलेंडर रिफिल मुक्त मिळणार आहे.

योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना
फायदा प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत
कोणी सुरूवात केली ? महाराष्ट्र सरकार
योजनेची सुरूवात कधी झाली ? महाराष्ट्राच्या २०२४ अंतिम अर्थसंकल्पात
उद्देश गरिब कुटुंबातील महिलांना धुरापासून मुक्तता
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
अधिक माहितीसाठी वेबसाईट  Click here

अन्नपुर्णा योजनेसाठी पात्रता

  • अन्नपुर्णा योजनेसाठी महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आला आहे. याद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना याचा फायदा होऊ शकतो.
  • अन्नपुर्णा योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर गॅस कनेक्शन महिलेची नावावर असलं पाहिजे.
  • आतापर्यंत या योजनेसाठी उज्वला योजना, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. परंतु पुढील काळात सर्वच महिलांना याचा फायदा दिला जाणार आहे.
  • एक राशन कार्डवर एकाच महिलेला याचा फायदा होणार आहे.
  • अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र महिलेला १४.२ किलो गॅस मोफत दिला जाणार आहे.
  • या योजनेसाठी फक्त पाच कुटुंब सदस्य असलेल्यांना फायदा दिला जाणार आहे. एक महिन्यात फक्त एकच गॅस दिला जाणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • कौटुंबिक ओळखीचा पुरावा
  • गॅस कनेक्शन (आधीपासून असल्यास, किंवा उज्ज्वला योजना खाते)
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा फॉर्म

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी (Mukhyamantri Annapurna Yojana) अर्ज प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांना याआधी उज्वला तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. त्या महिलांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी पात्र महिलांनी खालील प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? 

  • सर्वप्रथम तुम्हाला अन्नपुर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीसाठी नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना नोंदणी फॉर्ममध्ये भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, पत्ता मोबाईल नंबर इत्यादी.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर वेबसाईटच्या मेनू पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता मेनूमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती जसं की महिलेचे नाव, बॅंक खाते तपशील, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर भरावे लागेल.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवले जाईल.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ? 

  • अन्नपुर्णा मुख्यमंत्री योजनेसाठी ऑफलाईन (Mukhyamantri Annapurna Yojana) पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयात जावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला अन्नपुर्णा योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. त्यात महिलेची माहिती भरावी लागेल.
  • तुम्हाला हवे असल्यास दिलेल्या लिंकवरून अन्नपुर्णा योजना फॉर्म PDF डाऊनलोड करू शकता.
  • अन्नपुर्णा योजना फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंडआऊट घ्यावी लागेल. त्यात माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला योजनेशी संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
  • कागदपत्रे जोडल्यानंतर जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयात जाऊन ते जमा करावे लागेल. तिथून पावती घ्यावी लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही अन्नपुर्णा योजनासाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची यादी कशी तपासायची ?

  • सर्वप्रथम तुम्हाला अन्नपुर्णा योजनेच्या (Mukhyamantri Annapurna Yojana ) अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ओटीपीने लॉगईन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला मेन्युवर क्लिक करावे लागेल नंतर अल्पिकेशन तयार केलेल्या पुर्वीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना यादी ओपन होईल. त्यावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकार तुम्ही अन्नपुर्णा योजनेची यादी तपासू शकता.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना महत्वाच्या लिंक

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा फॉर्म Click here
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा शासन निर्णय Click here
अन्नपुर्णा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज Click here
Join WhatsApp Click here
Join Telegram Click here