aadhaar bank link : सरकारच्या कल्याणकारी योजना असो किंवा पेन्शन, शिष्यवृत्ती यासारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्यांना लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहेत. अशातच महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी सरकारकडून पात्र महिलांना दोन टप्प्यात महिन्याला प्रत्येकी १५०० रूपये देण्यात आले आहे. परंतु अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. याचं महत्वाचे कारण म्हणजे अजूनही काही महिलांनी आपला बँक खाते आधार कार्डला लिंक केलेला नाहीय. यातच या योजनेचा तिसरा हप्त्या २९ सप्टेंबर रोजी जमा होणार आहे. परंतु त्याआधी तुमचा आधार कार्ड बॅंकला लिंक आहे की नाही. ते लगेचच तपासून घ्या. याचसोबत तुमचा आधार कार्ड कोणत्या बॅंकेला कनेक्ट आहे. ते देखील तुम्ही याठिकाणी तपासू शकता.
आपल्या बँक खात्याला आधार कार्ड शी लिंक झाले की नाही. हे कसे तपासायचे?
जाणून घ्या. योग्य पद्धत
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर बँकेकडून आपला आधार कार्ड बँकसोबत लिंक झाला आहे की नाही. यासंदर्भात सतत मँसेज किंवा इमेल येत असतात. परंतु तरी देखील तुम्हाला तुमचा आधार कार्ड बँक ला लिंक झाला आहे की नाही? याबाबत तुम्ही UIDAl या वेबसाईटवर तपासू शकता.
१) सुरूवातीला तुम्ही गुगलवर सर्च करा. https://uidai.gov.in/ “ या वेबसाईटवर जा.
२) वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला भाषा निवडा असा पर्याय येईल. यामधून तुम्ही मराठी असा पर्याय निवडू शकता.
3) यानंतर तुम्हाला “माझा आधार” , (My Aadhar) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
४)वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर “आधार व बॅंक खाते जोडण्याची स्थिती तपासा”, (Check Aadhaar and bank account linking Status) वर क्लिक करा.
५) क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. त्यानंतर लॉगीनवर क्लिक करा.
६) यानंतर तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्याचसोबत खाली दिलेला एक कोड व्यवस्थित टाका.
७) यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी आला असेल. तो ओटीपी तुम्ही त्यात भरा आणि सबमिट करा.
८) यानंतर तुम्हाला ”Bank Seeding status”, असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
८) आता आधार कार्ड लिं झाला असेल तर तुम्हाला Congratulations..! Now you aadhaar and bank account link असा मँसेज दिसेल.
टीप :-कृपया लक्ष द्या. वरती सांगितल्याप्रमाणे जर आधार कार्ड बँकला लिंक झालं नसेल तर तुम्ही संबंधीत तुमच्या बँकेत जाऊन चौकशी करा.
आधार कार्ड बँकला लिंक केल्याने काय फायदे होतात ? (aadhaar bank link status)
१) कोणत्याही बँकेत खातं उघडण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर होते.
२) केवायसी करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे द्यावे लागतात. प्रक्रियेसाठी आवश्यक किमान दस्तऐवज.
३) यामुळे सरकारकडून देण्यात येणु सबसिडींचा थेट लाभ होतो.
४) सरकारकडून देण्यात येणारी पेन्शन, कल्याण निधी, विविध मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या सहज मिळतात.
५) आधार कार्ड लिंक असल्याने बँक खातं अधिक सक्षम होतं.
६) यामुळे सरकारी खर्च कमी करण्यात मदत होते.
बँक शाखेच्या माध्यमातून आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करावे ? (aadhaar bank link)
१) आपल्या बँकच्या जवळच्या शाखेत जा.
२) आपल्या सोबत आधार कार्ड किंवा झेरॉक्स किंवा त्याचा मोबाईल मध्ये फोटो सोबत ठेवा.
३) बँक शाखेतून आधार कार्ड लिंक करण्यासंबंधी फार्म घ्या.
४) त्या अर्जासह आधार कार्डची झेरॉक्स कॉपी जोडा.
५) तुमचा अर्ज आणि आधार कार्ड पाहिल्यानंतर आधार कार्ड बँक सोबत लिंक केला जाईल.
६) आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक झाला की त्याबाबत एक SMM तुमच्या मोबाईलवर येईल.
इंटरनेट बँकिंगद्वारे आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करावे ? (aadhaar bank link status)
१) आपल्या इंटरनेट बँकिंग पोर्टलमध्ये लॉग इन करा.
२) आधार आणि बँक खात्याचे लिंक करण्याच्या सेक्शनमध्ये जा.
३) आपण ज्या खात्यात लिंक करायचे आहे. ते निवडा. आपल्या आधार क्रमांकाची माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
४) आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर च्या शेवटच्या दोन अंक स्क्रीनवर दाखवले जातील.
५) आपला आधार कार्ड बँकसोबत लिंक झाला आहे की नाही. त्या संदर्भात तुम्हाला एक एसएमएस मोबाईल वरती प्राप्त होईल.
एटीएमद्वारे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे ?
१) सुरुवातीला संबंधित जवळच्या बँकच्या एटीएम वरती जा.
२) आपल्या बँक खात्याशी संबंधित डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये घाला आणि पिन एंटर करा.
३) स्क्रीनवरील आधार लिंक असा पर्याय निवडा.
४) आपल्या आधार क्रमांकाची माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल.
मोबाईल ॲपद्वारे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे ?
अनेक बँका त्यांच्या मोबाईल अँपच्या माध्यमातून आधार क्रमांकावर बँक खाते लिंक करण्याची सुविधा प्रदान करतात.
१) Google Play Store किंवा App Store वरून मोबाईल बँकिंग अँप डाऊनलोड करा.
२) अॅप उघडा आणि आपल्या खात्याशी संबंधित युजरनेम आणि पासवर्ड भरा.
३) “Requests”/”Service”Request यावर क्लिक करा.
४) “Link Aadhar”/Update Aadhar Number” या क्लिक करा.
५) आपल्या आधार कार्डला लिंक करायचे खाते निवडा.
६) आपल्या आधार कार्डची माहिती भरा.
७) लागू असल्यास, कोणतेही अटी व शर्ती स्वीकार करा.
८) Updated/ Confirm वर क्लिक करा.
आपल्या नातेवाईक, भाऊ बहीण किंवा मित्र मैत्रीणींच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील, तर आत्ताच तुम्ही यावर चेक करू शकता. ही लिंक लगेचच त्यांना पाठवा.