मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी असा करा अर्ज..! मोफत ५ लाख रूपये

Chief minister relief fund

Chief minister relief fund : महाराष्ट्र सरकारकडून समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र सरकारकडून अनेकदा सामान्य नागरिकांसाठी विविध प्रकराची मदत केली जाते. यामध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी हा राज्यातील गरजूंना आर्थिक मदत पुरवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामाध्यमातून पाच लाखांपेक्षा अधिक मदत सरकार पुरवत आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, आपत्तीग्रस्तांना आणि विविध गरजांसाठी हा निधी वापरला जात आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय ? 

महाराष्ट्र सरकारकडून गरीबांना मदत करण्यासाठी एक वेगळा निधी बाजूला ठेवला आहे. या निधीतून गरीब, गरजू, आजारी, किंवा आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. याच निधीला मुख्यमंत्री सहायता निधी म्हणतात. हा निधी सामान्यत: जनतेकडून देणग्या, व्यावसायिक संस्था आणि उद्योगांद्वारे सरकारकडे मदत म्हणून जमा केली जाते. तीच मदत राज्यातील नागरिकांसाठी वापरली जाते.

मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी अर्ज करण्याची एक साधी आणि सोप्पी पद्धत आहे. अर्जदाराने व्यवस्थित अर्ज दाखल केला की तो अर्ज सरकारकडे जातो. त्याची व्यवस्थित पडताळणी होते. तसेच संबंधित मदतीसाठी मागवलेल्या कागदपत्रांची पुर्तता केली की लगेचच तो निधी सरकारकडून व्यक्तींच्या खात्यात जमा होतो.

पात्रता

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा

अर्जदार आर्थिक दृष्टा दुर्बल असावा

अर्जदाराला शासकीय किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून मदत मिळत नसावी

आवश्यक कागदपत्रे :

१) मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म  (अर्जाची प्रत )

२ ) उपचार घेत असलेल्या हाँस्पिटलचे कोटेशन. कोटेशनवर सिव्हिल सर्जनचा सही शिक्का

3) आधार कार्ड

4) रेशनकार्ड

5) उत्पन्नाचा दाखला 1 लाख 60 हजार पर्यंत ( चालू वर्षाचा )

6) अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट

7) सिटीस्काँन, MRI, इत्यादी संपूर्ण रिपोट

8) अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट.

अर्ज कसा करायचा?

अर्जदाराने मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुरूवातीला ऑनलाईन अर्ज करावा. त्या अर्जामध्ये मागवलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे जोडावी. त्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर निधी मंजूर झाल्यास तो थेट अर्जदाराच्या बॅंक खात्यात पैसे जमा होतात.

मुख्यमंत्री सहायत्ता निधी फॉर्मचा  अर्ज – क्लिक करा

 

मुख्यमंत्री सहायत्ता निधी अधिकृत वेबसाईट- क्लिक करा

 

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुग्णालयांची यादी तपासा – क्लिक करा

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीटोल फ्री क्र : 8650567567

 

अर्जदाराने ऑफलाईन अर्ज सादर केल्यास तो या aao.cmrf-mh@gov.in  ईमेलवर पाठवावा.  तसेच मुळ अर्जाची प्रत तुम्ही पोस्टद्वारे पाठवणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री सहायती निधीतून किती रूपयांपर्यत मदत मिळू शकते ? 

सरकारकडून मुख्यमंत्री सहायती निधीतून गरजू व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते.

१ ) वैद्यकीय मदत –

या मदतीमध्ये गंभीर आजारांवर उदाहरणार्थ कर्करोग, ह्यदयविकार, मुत्रपिंड प्रत्यारोपण असा आजारांवर साधारण ५०,००० रूपयांपासून ते ३ लाख रूपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. काही गंभीर आजारांसाठी पाच लाख रूपयांपर्यंतही मदत वाढवली जाते.

२ ) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास-

नैसर्गिक आपत्तीमध्ये घराचे नुकसान झाल्यास १०,००० ते १ लाख रूपयांपर्यंत मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विशेष आर्थिक सहाय्य जाहीर केल्यास मदत वेगळी असते.

३ ) शैक्षणिक मदत-

गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी २५,००० ते १ लाख रूपयांपर्यंत मदत दिली जाऊ शकते.

४ ) इतर सामाजिक आणि विशेष परिस्थितीत-

विधवा, दिव्यांग आणि इतर गरजुंना २०,००० ते ५०,००० रूपयांपर्यंत सहाय्य दिले जात आहे. यामध्ये विशेष प्रकल्प किंवा सामाजिक उपक्रमांसाठी रक्कम वाढवली जाऊ शकते.