महारोजगार मेळावा : पुण्यात मुलाखतीद्वारे भरली जाणार तब्बल २००० पदे

Maharojgar Melawa Pune

Maharojgar Melawa Pune : परीक्षा संपल्या आहेत. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का ? तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण नोकरीची चिंता आता मिटणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा परिषद व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योगांमधील २ हजार पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अर्ज कुठून करावा :  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज डाऊनलोड करावा.

मुलाखतीस येतांना काय काय आणावे :

  • उमेदवारी अर्ज
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जाच्या प्रती

ठिकाण : नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बंडगार्डन रोड, पुणे

  • वेळ : सकाळी दहा वाजता
  • वार : शुक्रवारी,
  • दिनांक : १७ जानेवारी २०२५

पात्रता : १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, ITI, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)

इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित वेबसाईटवर माहिती वाचणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीस हजारोंच्या संख्येने इच्छूक उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना नोकरी हवी आहे. त्या सर्व इच्छूक उमेदवारांनी वेळेच्या आधी येणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यासाठी इतर देखील महत्वाचे व्यक्ती प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी ही शेवटची संधी सोडू नये.