SBI PO Bharti : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 16 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा ही 8 ते 15 मार्च 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे . यात मुख्य परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. यात खुला प्रवर्गासाठी 750 तर एसी आणि एसटी या प्रयोगासाठी कोणती फी आकारली जाणार नाही. तरीही संबंधित उमेदवारांनी संपूर्ण माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र.: CRPD/PO/2024-25/22
एकूण जागा : 600 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक
पदाचे नाव
पद संख्या
१.
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
600
एकूण
600 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
फी : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2025