Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवार गटाची संभाव्य यादी जाहीर..!

Sharad Pawar

Sharad Pawar : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजून वाजून एक ते दोन दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्यापही भाजप सोडून इतर महत्त्वाच्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.  महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपामध्ये चर्चा सुरू आहे,  मात्र अद्यापही जागावाटपावर तोडगा निघालेला नाही.  उद्या किंवा कदाचित परवा या आघाडीमध्ये जागा वाटपावरवरील फॉर्मुला निश्चित होण्याची शक्यता आहे.  त्याच वेळी दोन्ही गटाकडून तसेच काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 39 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत 10 पैकी आठ जागांवर शरद पवार गटाने मोठा विजय मिळवला.  त्यांचा महाविकास आघाडी स्ट्राईक रेट देखील चांगला होता. तोच स्ट्राईक रेट विधानसभेत देखील चांगला राहावा,  यासाठी महाविकास आघाडी कडून कमीत कमी जास्त कमीत कमी जागा लढवून त्या निवडून आणणे, हे ध्येय शरद पवार गटाने ठेवण्यात आले आहे.  अशातच आता जे विद्यमान आमदार राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर शरद पवारांच्या सोबत राहिले आहेत.  त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी निश्चित झाली आहे. अलीकडे शरद पवार गटाची पार्लमेंटली पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली.  या बैठकीत काही नाव निश्चित करण्यात आले आहेत.  यामध्ये जयंत पाटील, जितेंद्रआव्हाड अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा, अशा विद्यमान आमदारांच्या नावांची यादी देखील तयार झाली आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी वाचा

जयंत पाटील – इस्लामपूर

जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा

अनिल देशमुख – काटोल

राजेश टोपे – घनसावंगी

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर

रोहित पवार – कर्जत जामखेड

प्राजक्त तनपुरे – राहुरी

रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

सुनील भुसारा – विक्रमगड

अशोक पवार – शिरुर

मानसिंग नाईक – शिराळा

शशिकांत शिंदे – कोरेगाव

संदीप क्षीरसागर – बीड

हर्षवर्धन पाटील – इंदापूर

राखी जाधव – घाटकोपर पूर्व

राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराडा

युगेंद्र पवार – बारामती

समरजित घाटगे – कागल

राणी लंके – पारनेर

रोहिणी खडसे – मुक्ताईनगर

प्रभाकर देशमुख- मान खटाव

दिलीप खोडपे -जामनेर

राजीव देशमुख -चाळीसगाव

अमित भांगरे -अकोले

प्रतापराव ढाकणे -पाथर्डी

दीपिका ताई चव्हाण- बागलाण

प्रशांत जगताप -हडपसर

सचिन दोडके -खडकवासला

देवदत्त निकम -आंबेगाव

उत्तमराव जानकर- माळशिरस

नंदाताई कुपेकर बाभुळकर -चंदगड

पृथ्वीराज साठे- केज विधानसभा

भाग्यश्री आश्रम- अहेरी

गुलाबराव देवकर आप्पा -जळगाव शहर

प्रदीप नाईक जाधव -किनवट

जयप्रकाश दांडेगावकर -वसमत

बाबा जाणीदुरानी -पाथरी

विजय भांबळे -जिंतूर

चंद्रकांत दानवे-भोकरदन

आदिवासी लढ्याला मोठं यश, पेत्रा क्षेत्रातील ३६५ कृषीसेवकांना नियुक्ती

PESA jOBS

PESA JOBS : नाशिक : आदिवासी बहुल क्षेत्रातील अर्थात पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पदभरती व्हावी. यासाठी राज्यात मागील काही दिवसांपासून आदिवासी समाज आक्रमक झाला होता. अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोनल करून सरकारच्या पुढे त्यांनी आपल्या मागण्या समोर ठेवल्या होत्या. यासंदर्भात नाशिक येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज एकवटले होते. तर मुंबईत मंत्रालयातील संरक्षक जाळीवर आदिवासी समाजातील प्रतिनिधिंनी उड्या घेत सरकारचं याकडे लक्ष वेधलं. त्यांच्या या लढ्याला आता मोठं यश आलं आहे.

पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून भविष्यात येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून राज्य सरकारने पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील ३६५ कृषी सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संवर्गातील जागा मानधन तत्वावर भरण्याचे सरकारचे आदेश आहेत. यात २८८ जागा अनुसुचित जातीच्या तर ७७ पदे अन्य प्रवर्गातील आहेत. त्यात सर्वाधिक १४७ जागा नाशिक विभागातील आहेत.

या रिक्त पदांची संख्या सुमारे ६ हजार ९३१ असून ही पदे भरण्याबाबत मागणी होत होती. कृषी विभागाने वर्षभरापुर्वी कृषी सेवकांच्या २ हजार १०९ पदांसाठी परिक्षा घेतली होती.. त्यातील १ हजार ७४४ पपदांवर नुकतीच नियुक्ती देण्यात आली आहे.

पेसा क्षेत्रातील भरतीसंदर्भात राज्यातील सर्व आदिवासी आमदार आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी घेत सरकारचा निषेध केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांना भेटीची वेळ देत यासंदर्भात निर्णय दिला.

याबाबत २९ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली होती. त्यावेळी आदिवासी बांधवांचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबुत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली जातील असेही यावेळी शिंदेंनी स्पष्ट केले होते. त्याच अंतर्गत पेसा क्षेत्रातील सर्व आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पद प्राधान्याने भरण्यात येतील असेही त्यांनी सांगितले होते.