धाराशिव : काही लोक आमच्या सोबत होते, आम्ही तुम्हाला सांगितला त्यांना निवडून द्या. काही लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबतही होते. नंतर त्यांनी साथ सोडली आणि भाजपच्या पंक्तीत जाऊन बसले. आधी सांगायचे आम्हाला विकास करायचा आहे. लोकांना हे पटलं नाही. भुजबळ नावाच्या मंत्र्यांनी परवा सांगितलं, आम्ही सत्तेत गेलो कारण आमची चौकशी सुरू होती, मला तुरुंगात टाकलं होतं, पुन्हा एकदा तुरुंगात जायचं नसेल तर मोदींच्या दारात जाणं आणि त्यांना सलाम करणं हाच पर्याय आमच्यासमोर राहिला म्हणून आम्ही विकास नाही तर मोदींपासून सुटका करण्यासाठी हा निकाल घेतला. एकप्रकारे लाचारीचे दर्शन आमच्या या सहकाऱ्यांनी दिले. असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.
महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे परांडा मतदारसंघाचे उमेदवार राहुल मोटे यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी राज्यातील निर्णय घ्यायचे ताकद तुम्ही महाविकास आघाडीकडे दिली पाहिजे. मग उद्धव ठाकरे असतील आणि आमचे बाकीचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून जो सत्ता बदल करायचा आहे त्यासाठी तुमची साथ हवी. असे आवाहन देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार तरी एक वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं की केंद्रामध्ये काही बदल करता येतील का? त्यासाठी तयार केलेल्या आघाडीचे नाव ठेवलं इंडिया आघाडी. महाराष्ट्रात लोकसभेला झालेला बदल हा तुम्ही केलात. या देशाची घटना तुम्ही वाचवली. घटना आणि माणसांचा अधिकार वाचवण्याचा काम तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभा तुम्हा लोकांच्या विचाराच्या हाती हवी. तुम्ही जे आमदार निवडून द्याल त्यांच्या हाती सत्ता हवी. लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवता येतात. असेही ते म्हणाले.
दरम्यान, वीस पंचवीस वर्षांपूर्वी या भागात आल्यावर ऐकायला मिळायचं की लोकांना पाणी नाही बागायत पीक नाही. त्यामुळे लोकांनी कसे जगायचे हा प्रश्न होता. पण राहुल भैया यांना तुम्ही शक्ती दिली त्यावेळी राज्याचा कारभार हा आमच्या हाती आला त्या संधीचं सोनं त्यांनी केल. आणि आज या भागात जास्तीत जास्त तलाव झाले. इतकच नाही तर हा तालुका २५ लाख टन ऊस तयार करतो. एकेकाच्या दुष्काळाला तोंड देणारा रोजगार हमीच्या कामाला जाणारा हा तालुका तुमच्यासारखा कष्टकरी शेतकरी उसाची उभारणी करतो. हा चमत्कार तुम्ही लोकांनी दाखवला. अशीही आठवण त्यांनी (Sharad Pawar) करून दिली.