Sharad pawar News : “राज्य बदलणं आणि परिवर्तन घडवणं हा एकच पर्याय आता”

Sharad Pawar

Sharad pawar News : जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार जो आम्ही केला आहे.  त्याला तुमच्या मार्फत नक्की शक्ती दिली जाईल. हा विश्वास आहे. लोकसभेत नरेंद्र मोदींनी स्वतःचे घेऊन नेमकं काय केलं. यांनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? देशात शेतकऱ्यांची, महिलांची, तरुण पिढीची अवस्था काय आहे. आज महाराष्ट्रात नवशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काळ्या आईची इमान राखणारा शेतकरी या मार्गाला का जातो? त्याचं महत्त्वाचं कारण शेतकरी कर्जबाजारी होतो आणि त्याच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी देशभर फिरतात पण या मुद्यांमध्ये ते हात घालत नाहीत. असा हल्लाबोल शरद पवार यांनी विरोधकांवर केला.

एरंडोल मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी ते बोलत होते.  लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना पैसे देण्यात आले. मात्र महिलांवर होणारे अत्याचार, जे हल्ले होतात त्यातून सुटका होण्यासाठी नेमकं काय केलं? केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ९००० हून अधिक होणे बेपत्ता आहेत. यावर प्रश्न उपस्थित केला. तर याकडे सरकार ढुंकूनही बघायला तयार नाही. तरुणांची हीच अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीला पर्याय एकच आहे राज्य बदलणं आणि परिवर्तन घडवणं. शेवटी बदल करायचा असेल तर एकटाच काम नाही यासाठी आम्ही एकत्र आलोय. असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांसह महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना समजावून सांगणार आहोत. हा बदल केल्याशिवाय तुमचा संसार सुधारणार नाही. सतीश पाटील यांनी आपल्याशी बोलताना सांगितले की ही माझी शेवटची निवडणूक आहे. मात्र मी त्यांना एवढेच सांगतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद आहात. त्या पक्षाचा अध्यक्ष मी आहे,  कोणी थांबायचं किंवा थांबायचं नाही हा निकाल घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. तो अधिकार मी घेईल. त्यामुळे मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात असे काही वेगळे घडले असेल त्या आपण दुरुस्त करूया. हे दुरुस्त यासाठी करायचे आहे की आपल्या लोकांचा संसार, लोकांचे जीवन बदलायच आहे या कामाला सर्वांची मनापासून मदत मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“एकप्रकारे लाचारीचेच दर्शन आमच्या सहकाऱ्यांनी दिले”, शरद पवारांची टिका

Sharad Pawar

धाराशिव : काही लोक आमच्या सोबत होते, आम्ही तुम्हाला सांगितला त्यांना निवडून द्या. काही लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबतही होते.  नंतर त्यांनी साथ सोडली आणि भाजपच्या पंक्तीत जाऊन बसले. आधी सांगायचे आम्हाला विकास करायचा आहे.  लोकांना हे पटलं नाही. भुजबळ नावाच्या मंत्र्यांनी परवा सांगितलं, आम्ही सत्तेत गेलो कारण आमची चौकशी सुरू होती, मला तुरुंगात टाकलं होतं, पुन्हा एकदा तुरुंगात जायचं नसेल तर मोदींच्या दारात जाणं आणि त्यांना सलाम करणं हाच पर्याय आमच्यासमोर राहिला म्हणून आम्ही विकास नाही तर मोदींपासून सुटका करण्यासाठी हा निकाल घेतला. एकप्रकारे लाचारीचे दर्शन आमच्या या सहकाऱ्यांनी दिले. असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.

महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे परांडा मतदारसंघाचे उमेदवार राहुल मोटे यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी राज्यातील निर्णय घ्यायचे ताकद तुम्ही महाविकास आघाडीकडे दिली पाहिजे. मग उद्धव ठाकरे असतील आणि आमचे बाकीचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून जो सत्ता बदल करायचा आहे त्यासाठी तुमची साथ हवी. असे आवाहन देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार तरी एक वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं की केंद्रामध्ये काही बदल करता येतील का? त्यासाठी तयार केलेल्या आघाडीचे नाव ठेवलं इंडिया आघाडी. महाराष्ट्रात लोकसभेला झालेला बदल हा तुम्ही केलात. या देशाची घटना तुम्ही वाचवली. घटना आणि माणसांचा अधिकार वाचवण्याचा काम तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभा तुम्हा लोकांच्या विचाराच्या हाती हवी. तुम्ही जे आमदार निवडून द्याल त्यांच्या हाती सत्ता हवी. लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवता येतात. असेही ते म्हणाले.

दरम्यान,  वीस पंचवीस वर्षांपूर्वी या भागात आल्यावर ऐकायला मिळायचं की लोकांना पाणी नाही बागायत पीक नाही. त्यामुळे लोकांनी कसे जगायचे हा प्रश्न होता. पण राहुल भैया यांना तुम्ही शक्ती दिली त्यावेळी राज्याचा कारभार हा आमच्या हाती आला त्या संधीचं सोनं त्यांनी केल. आणि आज या भागात जास्तीत जास्त तलाव झाले. इतकच नाही तर हा तालुका २५ लाख टन ऊस तयार करतो. एकेकाच्या दुष्काळाला तोंड देणारा रोजगार हमीच्या कामाला जाणारा हा तालुका तुमच्यासारखा कष्टकरी शेतकरी उसाची उभारणी करतो. हा चमत्कार तुम्ही लोकांनी दाखवला. अशीही आठवण त्यांनी (Sharad Pawar) करून दिली.

कळवणमधून जे.पी.गावित डाव पलटणार; नितीन पवारांना दाखवणार घरचा रस्ता ?

JP Gavit vs Nitin Pawar

JP Gavit : नाशिक : बुधवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत माकपच्या वतीने माजी आ जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कळवण मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून विद्यमान आमदार नितीन पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कळवण मतदारसंघात जे.पी.गावित (JP Gavit) विरूद्ध नितीन पवार अशी लढत निश्चित झाली आहे.

गावित विरूद् पवार अशी सतत लढत

मतदारसंघाची पुनर्नविभागणी झाल्यानंतर याठिकाणी जे.पी. गावित (JP Gavit) विरूद्ध माजी मंत्री अर्जुन पवार यांच्याच अटीतटीची लढत बघायला मिळाली आहे. एक वर्ष जे.पी. गावित तर दुसऱ्या वर्षी अर्जुन पवार यांनी कळवण मतदारसंघावर सत्ता स्थापन केली आहे. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी ए.टी.पवार यांचं निधनानंतर त्यांचे सुपुत्र नितीन पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडे पुन्हा मतदारसंघ आणला.

मोहन गांगुर्डे यांच्यामुळे गावित यांचा मार्ग मोकळा

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी, माकप आणि शिवसेना अशी लढत झाली. यात शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांना २३,०५२ मत पडल्याने त्याचा फटका जे.पी. गावित यांना बसला. यामुळे नितीन पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. परंतु यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने माघार घेतल्याने मोहन गांगुर्डे यांनी जे.पी. गावित यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे.पी. गावित यांचं पारडं जड मानलं जात आहे.

शरद पवारांचाही पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत जे.पी. गावित (JP Gavit) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शरद पवार यांनी माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तडजोड घडवून आणली होती. मात्र तेव्हा त्यांच्याच बिनसलं होते. परंतु अखेरच्या क्षणी गावित यांनी माघार घेतल्याने शरद पवार गटातील उमेदवार भास्कर भगरे यांचा विजय झाला. एका नवख्या शिक्षकाने एका केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांचा पराभव केला. त्यात जे.पी. गावित यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी जे.पी.गावित यांना विधानसभेसाठी शब्द दिल्याची माहिती आहे.

नितीन पवार पराभावाच्या छायेत

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जे.पी.गावित यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. याचदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत मोर्चा काढला होता. तर अलिकडेच पेसा भरती संदर्भात केलेले आंदोलन राज्यात चर्चेत आले होते. अशातच जे.पी. गावित यांचे सर्व विरोधक एकत्रित आले आहेत. अलिकडेच एका सभेत शेवटची निवडणूक लढवत असल्याचे जे.पी.गावित यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे विरोधक देखील पाठिंबा देतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Read Also : 

हेही वाचा…”ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच”, चंद्रकांत पाटलांच्या रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद 

हेही वाचा…विधानसभेसाठी शिंदेंचे उमेदवार ठरले; ४५ उमेवारांची पहिली यादी जाहीर 

हेही वाचा…मनसेची पहिली यादी जाहीर ; अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात 

हेही वाचा..”महाराष्ट्रात गुलाबी वादळ घोंगवणार”; अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर 

हेही वाचा…”मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही”, २८८ पैकी १९१ उमेदवार तयार ; महायुतीला थेट चँलेंज