Uddhav Thackeray : पुणे : जे होईल ते होईल, असे म्हणत मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महानगरपालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कॉंग्रेस एकत्रितच निवडणूक लढणार असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. तर त्यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मग त्यांना न्याय कधी मिळणार ?
महापालिकेच्या निवडणुका सर्व एकत्र असतानाही आम्ही वेगवेगळ्याच लढत होतो. मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतो. त्यात नवीन काय आहे ? महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. सर्व निवडणुका जर सर्वजण आपआपल्या सोईने लढवायला लागले तर कार्यकर्त्यांना काय सतरंज्या उचलायच्या का ? मग त्यांना न्याय कधी मिळणार ? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना न्याय मिळायला हवा. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
शेवटची बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही
राऊतांच्या घोषणेवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण ? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होते. असे माझं मत आहे. त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असे वाटत नाही. शेवटची बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही. असेही संकेत त्यांनी दिलं आहे.
अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. व्यक्तिगत पक्षाला संधी मिळत नाही, असे नाही पण आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आपण मतविभागणीचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाहिला आहे. मतविभागणीमुळे आपल्या ४५ जागा गेल्या आहेत. पण त्यांच्यावर टिका करण्यात अर्थ नाही कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु आगामी पालिका निवडणुकीत याचा फटका १०० टक्के बसणार आहे. असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, राऊतांच्या घोषणेवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण ? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होते, असे माझं मत आहे, त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असे वाटत नाही. शेवटची बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही. असेही संकेत त्यांनी दिलं आहे.