Social Welfare Department : समाज कल्याण विभागात २१९ जागांसाठी भरती

Recruitment for 219 Vacancies in Social Welfare Department

 Social Welfare Department : समाज कल्याण विभागाकडून इच्छूक उमेदवारांची मोठी भरती निघाली आहे. समाज कल्याण विभातील सात पदांसाठी एकूण २१९ जागांसाठी ही भरती असून अर्ज करण्याची १५ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी काही जागांसाठी दहावी पास तर काही जागांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात संपुर्ण माहिती खाली दिली आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवार आपला अर्ज देखील याठिकाणी सादर करू शकतो.

जाहिरात क्रमांक :-  सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743

 

एकूण जागा : २१९

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
उच्चश्रेणी लघुलेखक १०
गृहपाल/अधीक्षक (महिला) ९२
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) ६१
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ०५
निम्नश्रेणी लघुलेखक ०३
समाज कल्याण निरीक्षक ३९
लघुटंकलेखक ०९
  एकूण २१९
     

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 :

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.

(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

(iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.4:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.5:

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि

(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

(iv) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.6:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.7:

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) लघुलेखन 80 श.प्र.मि

(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : पुणे/महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here