परभणी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, म्हणून काल परभणीत सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात सुरेश धस यांच्यासह अनेक नेते आणि मोठ्या प्रमाणात लोक जमली होती. याचवेळी सुरेश धस यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर जोरदार निशाणा साधला. त्यावरून आता अजित पवार यांच्या गटातील त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावेळी सुरेश धस म्हणाले की, “संतोष देशमुख हत्येचा व्हिडिओ आकाला दाखवला असेल, आकाच्या आकाने पाहिला असेल तर ‘करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी.’ पण आज मी त्याबाबतीत बोलत नाही. ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, तसं आकाचे आका आले आणि म्हणाले, ‘जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या.’ पण आधी नीट वागायचं असतं हे कोणी सांगायचं? आणि ‘अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…?’ संदीप दिगुळेपासून संतोष देशमुखापर्यंत हत्येची बेरीज केली तर त्याचा मास्टरमाईंड कोण, कोणी हे उद्योग केले हे तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीची माणसं पाठवा. इतर समाजाला काय वागणूक मिळते, अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते?”, असंही ते म्हणाले.
सुरेश धस यांच्या टिकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधीव मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली. त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? अशी खोचक टिपणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
दरम्यान, पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, जगात जर्मनी आणि देशात परभणी असे या परभणीचे नाव आहे. मी या परभणीचा 18 महिने पालकमंत्री राहिलो आहे. परभणी किती रगेल आहे, परभणीची रग मला चांगली माहिती आहे. या परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास शिकणाऱ्या मुलाला कोंबिंग ऑपरेशन मध्ये नेलं आणि त्याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. विजय वाकोडे यांचाही मृत्यू झाला. कोंम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंब यांना दहा लाखांची मदत जाहीर केली. तर विजय वाकडे यांच्या कुटुंबियांना 5 लाख जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमनाथच्या कुटुंबियांना विरोध येणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांनाही वेळ देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.