“आदिवासींच्या जमीनी कोण हडप करतंय? कलेक्टरला कुणी पत्र पाठवलं”

J P Gavit

J P Gavit : कळवण : कळवण सुरगाणा भागाचे आमदार नितीन पवार यांनी कलेक्टरला पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? की या ठिकाणी जो काही वन जमिनीचा प्रश्न आहे. या वन जमिनी काही लोक हडप करतायेत म्हणून त्यांच्यावर सक्त कारवाई करा. आज कोण या जमिनी हडप करतंय? या जमिनीचे जतन कोणी केले आहे? सबंध महाराष्ट्राचा ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे त्या भागामध्ये तुम्ही चक्कर टाकली, माहिती काढली. तर आज या राज्यामध्ये या देशामध्ये जे जंगल वाचतंय ते केवळ आदिवासींमुळे वाचतंय दुसरा कोणीही ते जंगल वाचवलं नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो जल, जंगल आणि जमीन ही शेतकऱ्यांना, देशाला, राज्याला आदिवासींकडून एक प्रकारची देण आहे. ते काम या ठिकाणी होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. असा हल्लाबोल शरद पवार यांनी विरोधकांवर केला.

जीवा पांडू गावित यांचं शरद पवारांकडून कौतूक

कळवण सुरगाणा मतदारसंघाचे उमेदवार जे.पी. गावित (J P Gavit ) यांच्यासाठी शरद पवारांची कळवण येथे प्रचार सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी आमदार नितीन पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, या ठिकाणचा विरोधी जो आमदार आहे. तो पत्र लिहितो की, आदिवासींनी या ठिकाणी जमीन घेतली असेल तर ती त्यांच्याकडून काढून घ्या, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. मला आनंद आहे की, हा प्रश्न आणि त्यासंबंधीची जागृती करण्यासाठी कॉ. गावित यांनी इथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली. सबंध देशाचे लक्ष तुम्हा लोकांकडे गेलं. हा जो मोर्चा होता तो अभूतपूर्व असा मोर्चा होता.

त्या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला, राज्याच्या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना, वृत्तपत्रांना, टेलिव्हिजनला एक प्रकारचं जागृती करण्याचे काम कॉ. गावित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आणि आदिवासींच्या मालकीची जी काही जमीन असेल ती त्यांच्या पदरात घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. हा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला. मी त्यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो की, तुम्ही त्या कष्टकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करताय. त्या तुमच्या संघर्षाच्या पाठीशी उभं राहणं आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील त्यांनी दिला.

ते लोक आदिवासींना आदिवासी म्हणत नाहीत

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांचा आदिवासींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चमत्कारिक आहे. ते आदिवासींना आदिवासी म्हणत नाहीत, वनवासी म्हणतात. हा वनवासी शब्द आला कुठून? काल सबंध वनवासीचा हा आमचा आदिवासी, आदिवासी आहे, जंगलाचा रक्षक आहे, कष्ट करणारा आहे, शेती करणारा आहे, समाजाच्या हिताची जपणूक करणारा आहे आणि म्हणून त्याला वनवासी म्हणून एका वेगळ्या दिशेला नेण्यासंबंधीचे पाऊल आज राज्यकर्ते टाकत असतील ही गोष्ट आम्ही कदापी मंजूर करणार नाही. त्यादृष्टीने आज कॉ. गावीत अखंडपणाने काम करत आहेत. मला ठाऊक आहे,  मी राज्याचा प्रमुख होतो त्या काळामध्ये सुद्धा कॉ. गावीत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होते. त्या सगळ्या कामांमध्ये एक वेळेस सुद्धा या गृहस्थांनी व्यक्तिगत काम आम्हाला कधी सांगितलं नाही. जे काही प्रश्न मांडले ते आदिवासींचे मांडले, आया बहिणींचे मांडले, बेरोजगार तरुणांचे मांडले, शेतकऱ्यांचे मांडले, विकासाच्या संदर्भातले मांडले.

शिवाजी महाराज पुतळ्याचे काम अर्धवट

आज मी येताना शिवछत्रपतींचा पुतळा पाहिला आणि मला लक्षात आलं की, याच्या उद्घाटनाला मला बोलावलं होतं. मी स्वतः आलो होतो आणि त्या वेळेला ज्या प्रकारची रोषणाई त्या ठिकाणी केली. त्यामुळे त्या पुतळ्याचे खरे स्वरूप आम्हाला काही बघता आलं नाही. पण अश्वारूढ शिवाजी महाराजांचा उंच पुतळा हा त्या ठिकाणी अवश्य दिसला. आज येताना मी बघितलं त्या पुतळ्याचे काम अर्धवट राहिलेला आहे, त्याच्या कामामध्ये काहीही प्रगती झाली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे दैवत, या देशाच्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटावं अशा प्रकारचे हे होतं. एकादृष्टीने युगपुरुष युगायुगामध्ये असं कर्तुत्व असलेली व्यक्ती जन्माला येत नाही. ती जन्माला या राज्यात आली आणि म्हणून तुम्हाला मला त्यांचा अभिमान आहे. म्हणून त्यांचा पुतळा केला तर आनंद आहे. पण पुतळा केल्यानंतर ते काम अर्धवट ठेवणं ही शिवछत्रपतींची अप्रतिष्ठा आहे. त्यासाठी जे जे जबाबदार असतील. त्या सगळ्यांकडे आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बघावे लागेल.

हे काम दुरुस्त कसे होईल? व्यवस्थित कसे होईल? याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यासाठी या निवडणुकीनंतर प्रमुख लोकांनी बसावं आणि हे अर्धवट काम योग्य रस्त्यावर न्यावं. त्याला काही शासकीय अडचणी असतील ते आम्हा लोकांच्या कानावर घालावं. शिवाजी महाराजांना बेज्जत करण्याचे काम या ठिकाणी झाले ते दुरुस्त करायचं आहे हे मुद्दाम मी आग्रहाने या ठिकाणी सांगू इच्छितो असेही ते म्हणाले.

दरम्यान, कॉ. गावीत यांना तुम्हा मत द्या. या मताच्या जोरावर राज्यामध्ये सत्तेचे परिवर्तन आपण करू. सत्तेचे परिवर्तन केल्यानंतर विकासाचा प्रश्न असो, आदिवासींचा प्रश्न असो, स्त्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न असो, बेकार तरुणांचा प्रश्न असो या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष केंद्रित करून एक वेगळा प्रगत आणि यशस्वी महाराष्ट्र दाखवणं हे काम आम्ही लोक निश्चितपणाने करू, हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना देतो आणि त्यासाठीच कॉ. गावित यांची उमेदवारी तुम्हा सर्वांसमोर सादर केली. मोठ्या मतांनी तुम्ही त्यांना विजयी करा. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Ramesh Thorat : “आता आश्वासन नको, बदल हवा..! विकासासाठी ‘रमेश’दादा हवा”

Ramesh Thorat

Ramesh Thorat : कळवण : ‘निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा’ असे म्हणत रमेश थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी रमेश थोरात कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन लोकांशी संपर्क साधण्याचं काम सुरू केले आहे. यातच आता कळवण- सुरगाणा मतदारसंघासाठी त्यांचा जाहीरनामा सोशल मीडियावर फिरू लागला आहे.

नव्या पर्वाची, नवी सुरूवात, प्रामाणिकपणे सोबत प्रत्येक संघर्षात. धुरंदर, लढाऊ असंख्य गुणयुक्तव्यक्तिमत्व, जनतेच्या ह्यदयातील आपल्या हक्काचा माणूस अशा पद्धतीने रमेश थोरात यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरू केला आहे. गणपती उत्सवात देखील रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी विविध गावांमध्ये जाऊन गणपती मंडळांना भेटी दिल्या. याच दरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यातच आता आश्वासन नको, बदल हवा. विकासासाठी रमेशदादा हवा. असे म्हणत जोरदार प्रचार सुरू केला आहे. रमेश थोरात हे सुरगाणा नगरपंचायतचे माजी नगरसेवक आहेत.

धनशक्ती विरुध्द जनशक्ती

आमदार म्हणून निवडून आल्यास कळवण-सुरगाणा मतदारसंघात विकासाची काय कामं करणार ? त्यावर एक जाहिरनामा प्रसिद्ध होत आहे. यामध्ये कळवण शहरापासुन 5 कि.मी. वर असलेले सर्व प्रशासकीय कार्यालय कळवण शहरात आणणार सध्या असलेल्या प्रशासकीय कार्यालयात येथे भव्य मेडिकल कॉलेज उभारणार. पाण्याचे योग्य नियोजन करून मतदार संघातील शेतकरी वर्ग व पिण्याच्या पाण्याचे टंचाई कायमस्वरुपे नियोजन करणार व सिमेंट बंधारे, माती बंधारे तसेच धरणे बांधणार.

मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीतील नगरपंचायततील, सा.बां. विभागा अंतर्गत येणारे गावपाड्यावरील सर्व रस्ते करणार व मुलभुत सुविधे अंतर्गत येणाऱ्या योजना राबविणार. सर्व सुविधांनी युक्त हॉस्पिटल्स् ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी एम.डी../ एम.बी.बी.एस व एम.एस असे सर्व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करणार. मतदार संघातील गावराण जमिनी वर भव्य असे क्रिडांगण, व्यायामशाळा, वाचनालय, शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी उपलब्ध करून देणार वाढीसाठी जमिन मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार व शेतीसाठी जमिनी (अतिक्रमित) मिळवुन देणार.

निराधार आणि वृध्द लोकांसाठी वाढीव पेन्शन योजनासाठी प्रयत्न करणार जेणे करून निराधार राहणार नाही. (Ramesh Thorat)अंत्योदय रेशन कार्ड तयार करून देणार. लहान व मोठ्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि सर्व सुविधांनी युक्त असे ग्राऊंड ग्रामीण व शहरी भागात बनविणार. मतदार संघातील सर्व ग्रामपंचायत मार्फत लघु उद्योगांना चालना देऊन गावात रोजगार निर्मिती करण्यास भर देणार व सर्वांना घर देणार व गरजुंना घरकुल योजना राबविणार. महिला बचतगट तसेच पुरुष बचत गट प्रोत्साहान देऊन महिला व पुरुष बचत गटांचे समक्षीकरण करून बिनव्याजी कर्ज देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार. शेतकऱ्याला विकासाचा बिंदू ठेऊन कृषी विषयक योजना व कृषीला हमीभाव मिळवुन देणार व सर्व शेतीमालाला योग्य भाव मिळवुन देणार.

शेतकऱ्यांच्या विजबिल माफीसाठी प्रत्यत्न करुन 24 तास विज पुरवठा करण्यास मदत करणार. कळवण व सुरगाणा बसस्थानके आधुनिक करणार. व एस.टी. कर्मचारी यांचे प्रश्न (वेळावेळी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविणार नविन बस उपलब्ध करणार. मतदार संघातील अंगणवाडी सेविका व मदतनिस आशा स्वयंसेविका शिक्षक कर्मचारी, लिपीक, शिपाई तसेच प्रेरक प्रेरिका यांचे प्रश्न विधानसभेत मांडुन न्याय देणार. मतदार संघातील धरणे, तलाव यांच्या कामाला गती देऊन कायमस्वरुपी पाण्याचे दुष्काळी निवारण करणार. मतदार संघातील मंदिरे सुशोभित करणार. मतदार संघातील प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक प्राध्यापक कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी, लिपीक, ग्रामविकास बांधकाम महसुल विकास विद्युत कर्मचारी पोलिस पत्रकार डॉक्टर इत्यादी सर्व कर्मचारी अधिकारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविणार.

वनजमिनीचे प्रश्न मार्गी लावणार व स्वतंत्र्य 7/12 देणार. सर्व शासकिय योजनेंचे योग्य पध्दतीने अंमलबजावणी करून विकास करणार. मतदार संघातील सर्व ग्रामपचांयत, गट ग्रामपचायंत, जिल्हापरिषद, नगरपंचायत, यांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार. मतदार संघातील सर्व गावातील जि.प. शाळा सुसज्ज आणि उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून डिजीटल करणार. मतदार संघात आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार. (Ramesh Thorat)

मतदार संघातील सर्व व्यापारी बांधव यांच्या समस्या सोडविणार व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या जमिनीवर कमी दरात गाळे उपलब्ध करून देणार. (23) मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागात क्रांतिकारांचे व समाजसुधारक यांचे स्मारक उभारणार. अभोणा (मध्यवर्ती ठिकाणी), बोरगांव (सापुतारा हायवे), सुरगाणा (मध्यवर्ती ठिकाणी) भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार. भोगवटदार-2 मिळकती भोगवटदार-1 मध्ये रुपांतरीत करणार यात मतदार संघातील मिळकतदार यांना त्या मिळकतीचे फायदे मिळणार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मतदार संघातील यथाशक्ती योगदान राहिलेले स्वातंत्र्य सेनानी यांचे मतदार संघात मध्यवर्ती ठिकाणी मोठे असे स्मारक उभारणार. असे अनेक आश्वासनं त्यात देण्यात आलं आहे.

आदिवासींसाठी कळवण प्रकल्पात विविध योजना मंजूर..! ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

government schemes

government schemes :  कळवण प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण जि. नाशिक यांचे कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी इच्छूक लाभार्थ्यांकडुन विविध योजनांचे मंजूर अर्ज (government schemes) मागविण्यात आले आहेत.  कळवण प्रकल्प कार्यक्षेत्रातील न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत मंजुर असलेल्या योजनांचे अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांची निवड करण्याकामी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्या अनुसूचित जमातीच्या इच्छूक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ (government schemes ) देण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत खालील गट अ (उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना)  व गट क ( (मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना) गटातील खालील योजनांसाठी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ च्या आत  ( सुट्टीचे दिवस वगळून ) प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि. नाशिक येथे अर्ज सादर करावेत.  सदर योजनांचा अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण व कार्यक्षेत्रातील तहसिल कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (government schemes)

खाली मंजूर योजनांची यादी दिली आहे.

गट अ (उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना) 

१) अनुसूचित जमातीच्या ग्रामिण भागातील MSRLM व माविम मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस विविध व्यवसाय करण्यासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

२) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85% अनुदानावर प्लॅस्टीक ताडपत्री, कॅरेट, सोपंप खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे

३)  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आटा चक्की (घरघंटी) खरेदी करण्यासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

४) अनुसूचित जमातीच्या महिला/पुरुषांना रसवंती व्यवसाय करण्यासाठी 85% अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे

५) अनुसूचित जमातीच्या दिव्यांग युवक-युवतींना विविध व्यवसाय करणेसाठी 85% अर्थसहाय्य करणे

६) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कातकरी व पारवी जमातीच्या कुटूंबाना विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे

७) अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना व MSRLM मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस शेतात कीटक नियंत्रण करीता पीक संरक्षण यंत्र सौर स्वंयचलित प्रकाश सापळे खरेदी कामी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

८) प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्रातील सुरगाणा तालुक्यातील JL.G (संयुक्त दायित्व गट) गटांना मिल्क कलेक्शन सेंटर मध्ये संगणक, प्रिंटर, दुद्याची डिग्री/फॅट तपासणी युनिट खरेदीसाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

९) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कावेरी कोंबडी कुकूट पालन उद्योग करण्याकामी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

१०) अनुसूचित जमातीच्या ग्रामिण भागातील MSRLM व मान्यता प्राप्त आदिवासी समूह बचत गटांस खेकडा पालनासाठी 85% अनुदानावर अर्थसहाय्य करणे

११)  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 85% अनुदानावर मासेमारी करण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे

गट क (मानव साधन संपत्ती विकासाच्या योजना व आदिवासी कल्याणात्मक योजना)

१ ) अनुसूचित जमातीच्या अपघातग्रस्त / नुकसाग्रस्त कुटूंबांच्या जवळ-च्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करणे.

२) अनुसूचित जमातीच्या बचत गटास बँन्डसंच पुरवठा करणे. आदिवासी ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमाकरीता भांडी संच पुरवठा करणे.

अटी व शर्ती :-

१) लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा,

२) जातीचा दाखला,

३) आधार कार्ड,

४) रेशन कार्ड,

५) लाभार्थ्यांचे राष्ट्रियकृत बैंक खाते पासबूक झेरॉक्स,

६) उत्पन्नाचा दाखला/दारीद्र्य रेषेचा दाखला (अलिकडील १ वर्षाच्या आतील)

७) अपंग, विधवा, परितक्त्या प्रमाणपत्र (असल्यास),

८) मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड

९) अलीकडील काळातील २ पासपोर्ट आकाराचे सुस्पष्ट फोटो

१०) आवश्यकतेनुसार 7/12 खाते उतारा व नमुना 8 चा उतारा

११) ग्रामसभेचा ठराव

१२) बचत गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र

या पूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र इ. आवश्यक कागदपत्र जोडावेत. तसेच अपूर्ण असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज भरुन देण्यांची अंतिम मुदत ही दि.३० सप्टेंबर २०२४, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

प्रकल्प कार्यालयाकडून काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे

1) या कार्यालयात यापूर्वी सादर केलेला पात्र अपात्र अर्ज प्रतिक्षाधीन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

2) अर्जदाराने एखाद्या योजने करीता अर्ज केला म्हणजे तो त्या योजनेस पात्र झाला असे नाही.

3) अर्ज करतांना योजनेचे पूर्ण नाव टाकणे आवश्यक आहे, तसेच कागदपत्र परीपुर्ण असल्या शिवाय लाभ देय राहणार नाही.

4) लाभार्थ्यांची निवड करतांना प्रथम अपंग, विधवा, परितक्त्या, महिला, यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.