Ramesh Thorat : कळवण : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच कळवण-सुरगाणा मतदारसंघातून रमेश थोरात यांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आता आश्वासन नको, बदल हवा, विकासासाठी रमेशदादा थोरात असे म्हणत त्यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केला आहे. मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत थोरात यांनी निवडणूकीचं रणशिंग फुंकलं आहे.
रमेश थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कळवण-सुरगाणा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठविणारे खंबिर नेतृत्व शेतकरी, युवक, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, गोरगरिब यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, सर्वसामान्य हक्काचा माणूस, आपला माणूस. आपला रमेश दादा असा जोरादर प्रचार सध्या सुरू आहे. यातच नव्या पर्वाची, नवी सुरूवात प्रमाणिकपणे सोबत प्रत्येक संघर्षात. धुरंदर, लढाऊ असंख्य गुणयुक्तव्यक्तिमत्व, जनतेच्या ह्यदयातील आपल्या हक्काचा माणूस असा प्रचारही सोशल मीडियावर सध्या जोरदार सुरू आहे.
यातच गणपती उत्सवाच्या दरम्यान रमेश दादा थोरात सध्या विविध मंडळांना भेटी देत आहेत. कुंडाणे शिरसमणी जिरवाडा या गावात अलिकडेच थोरात यांनी भेट देत महाआरती केली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले. तसेच आता आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व मिळालं. आता आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. असे सांगत रमेश थोरात यांनी सर्व गावावातील समस्या जाणून घेतल्या. त्यावर मी येणार आणि तुमच्या समस्या सोडवणार तुम्ही घाबरू नका. आता मी तुमच्यासाठीच तुमची सेवा करण्यासाठी उभा असल्याचे थोरात यांनी गावकऱ्यांना सांगितले.
दरम्यान, तुमची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून मी या मतदारसंघाचे उमेदवारी करत. असून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच तुमच्या समस्या सोडविण्यासाठी येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व गावातील ग्रामस्थांनी दादांचा सत्कार केला.