Mazi Ladki Bahin Yojana : मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहिन्याला १५०० रूपये जमा होतात. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यावर दोन टप्प्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. यातच आता तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तिसरा हप्त्यातील पैसे कधी जमा होणार आहेत? याची तारीख आता समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर २९ सप्टेंबर २०२४ रोजी जमा होणार आहेत. राज्य सराकरकडून ही तारीख निश्चित ठरली. तर यासंदर्भातील मोठा कार्यक्रम रायगड येथे आयोजित केला जाऊ शकतो.
हेही वाचा…कळवणच्या भावी आमदाराने घेतल्या गावकऱ्यांच्या भेटी, दिली ‘ही’ आश्वासने
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र सरकारने आता ही तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. आता उरलेल्या महिलांना ३० तारखेपर्यंत योजनेचा अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून राज्य सरकारने या योजनेची तारीख आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असूनही अनेक महिलांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे सर्व महिलांना सुरूवातीला आपला आधार क्रमांक बॅंकेची लिंक करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता काय ?
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
यामुळे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद होऊ शकतो ?
१. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया काय ?
१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
Read Also :
हेही वाचा…कळवणच्या भावी आमदाराने घेतल्या गावकऱ्यांच्या भेटी, दिली ‘ही’ आश्वासने
हेही वाचा…भारत विरुद्ध बांगलादेश : बुमराह अन् सिराजचा मारा बांग्लादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणणार
हेही वाचा…निवडणूकीच्या आधीच भाजपमध्ये दोन बडे नेते नाराज, सोमय्यांनी अध्यक्षांना पाठवलं खरमरीत पत्र
हेही वाचा…आदिवासींसाठी कळवण प्रकल्पात विविध योजना मंजूर..! ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत ट