Ajit Pawar : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचला आहे. यातच भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आज महायुतीमधील राष्ट्रवादी ‘अजित पवार’ गटातील सोळा विद्यमान आमदारांना एबी फॉर्म्सच वाटप आज मुंबईत करण्यात आ लं. यातच आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह पक्षातील सगळे वरिष्ठ नेते यांची म्हणजे जवळपास 27 स्टार प्रचारक यांची यादी जाहीर केली आहे. हे स्टार प्रचारक संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी प्रचार करतांना दिसणार आहे.
महायुतीत ५० पेक्षा अधिक जागा मिळणार ?
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर लागलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar)गटाचा फक्त एकच ‘खासदार’ निवडून आला. खुद्द बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी ‘सुनेत्रा पवार’ यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवार गटाला याचा मोठा धक्का बसला. आता हा सर्व पराभव विसरून अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवार गट महायुतीत असून त्यांना महायुतीकडून 50 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांची घोषणा उद्या किंवा परवा होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. त्याआधी अजित पवार गटाकडून काही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी
अजित पवार,
प्रफुल पटेल,
सुनील तटकरे
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
नरहरी झिरवळ
हसन मुश्रीफ
आदिती ताई तटकरे
नितीन पाटील
सयाजीराव शिंदे
अमोल मिटकरी
जलाउद्दीन सय्यद
धीरज शर्मा
रूपालीताई चाकणकर
इद्रिस नायकवडी
सुरज चव्हाण
कल्याण आखाडे
सुनील मगरे
महेश शिंदे
राजलक्ष्मी भोसले
सुरेखाताई ठाकरे
उदयकुमार आहेर
शशिकांत तरंगे
वासिम ब्रुहान
प्रशांत कदम
संध्या सोनवणे
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटातील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या दोन्ही बाजूंनी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.? त्यातच या निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांचं राजकीय भवितव्य देखील अवलंबून राहणार आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar)गटातील उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील ? त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.