Sharad pawar News : जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार जो आम्ही केला आहे. त्याला तुमच्या मार्फत नक्की शक्ती दिली जाईल. हा विश्वास आहे. लोकसभेत नरेंद्र मोदींनी स्वतःचे घेऊन नेमकं काय केलं. यांनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? देशात शेतकऱ्यांची, महिलांची, तरुण पिढीची अवस्था काय आहे. आज महाराष्ट्रात नवशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काळ्या आईची इमान राखणारा शेतकरी या मार्गाला का जातो? त्याचं महत्त्वाचं कारण शेतकरी कर्जबाजारी होतो आणि त्याच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी देशभर फिरतात पण या मुद्यांमध्ये ते हात घालत नाहीत. असा हल्लाबोल शरद पवार यांनी विरोधकांवर केला.
एरंडोल मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी ते बोलत होते. लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना पैसे देण्यात आले. मात्र महिलांवर होणारे अत्याचार, जे हल्ले होतात त्यातून सुटका होण्यासाठी नेमकं काय केलं? केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ९००० हून अधिक होणे बेपत्ता आहेत. यावर प्रश्न उपस्थित केला. तर याकडे सरकार ढुंकूनही बघायला तयार नाही. तरुणांची हीच अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीला पर्याय एकच आहे राज्य बदलणं आणि परिवर्तन घडवणं. शेवटी बदल करायचा असेल तर एकटाच काम नाही यासाठी आम्ही एकत्र आलोय. असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांसह महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना समजावून सांगणार आहोत. हा बदल केल्याशिवाय तुमचा संसार सुधारणार नाही. सतीश पाटील यांनी आपल्याशी बोलताना सांगितले की ही माझी शेवटची निवडणूक आहे. मात्र मी त्यांना एवढेच सांगतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद आहात. त्या पक्षाचा अध्यक्ष मी आहे, कोणी थांबायचं किंवा थांबायचं नाही हा निकाल घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. तो अधिकार मी घेईल. त्यामुळे मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात असे काही वेगळे घडले असेल त्या आपण दुरुस्त करूया. हे दुरुस्त यासाठी करायचे आहे की आपल्या लोकांचा संसार, लोकांचे जीवन बदलायच आहे या कामाला सर्वांची मनापासून मदत मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.