मटणावर ताव मारायचा मग ही पाहा..!पुण्यातील सर्वात १० बेस्ट नानव्हेज हॉटेलस्

Top 10 non veg restaurants in Pune

Top 10 non veg restaurants in Pune : पुण्यात आलात. मग पुण्यात येऊन झणझणीत मटणावर ताव मारल्याशिवाय जाणार कसं ? मटण, चिकन, मासे, अंडाकरी असे पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आज आपण पुण्यातील सर्वोत्तम दहा मांसाहारी हॉटेलची यादी तयार केली आहे. पुण्यात कोणत्याही भागात असाल तरी ही यादी तुमच्या चवीचे गोडवे पुरवल्याशिवाय राहणार नाहीत. या हॉटेलमधील चव चाखल्यावर तुमचं पुन्हा पुन्हा मन याच हॉटेलकडे येणार हे नक्की आहे. काही लोकांमधून आपण काही हॉटेलची यादी तयार केली आहे.

१)  हॉटेल ‘साईनाथ’ ( Hotel ‘Sainath’)

पुण्यातील  ( Top 10 non veg restaurants in Pune)  सर्वात बेस्ट नान व्हेज हॉटेल पैकी साईनाथ खानावळ एक आहे. चिकन, मटण, कोल्हापूरी आणि मालवणी पदार्थ असणारी ‘साईनाथ हॉटेल’ काही दिवसात खवय्यांच्या पसंतीत उतरली आहे. पुण्यातील अल्का चौक, कुमठेकर रस्त्याची सुरूवात, पोलिस चौकी समोरही हॉटेल आहे. चिकन थाळी, मटन थाळी, एकदम स्वस्त आणि मस्त मिळतेय. रविवारी तसेच शनिवार या हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी असते. खाण्यासाठी लोक अर्धा-ते पाऊण तास वाट पाहून आपली भूक भागवातात. मी स्वत: या हॉटेलमध्ये चार ते पाच वेळा जाऊन आलो आहे. याठिकाणी भाकरी आणि सुक्कं चिकन एकदम खास आहे.

Hotel 'Sainath

२ ) ‘हॉटेल नागपूर’ (‘Hotel Nagpur’)

तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या चाहत्यांसाठी ‘हॉटेल नागपूर’, बेस्ट आहे. या हॉटेलमध्ये नागपूरी मटण, मसालेदार चिकन, तिखट मिसळ याचसोबत आणखी झणझणीत पदार्थ तुम्हाला मिळू शकतात. आपण गुगल मॅपवर जर हॉटेल नागपूर अंनास फाटा, १९९, सागर बेकरी जवळ असं टाकल्यास तुम्हाला या हॉटेलचा पत्ता अगदी सहज मिळू शकतो. नाही तर पुण्यातील कुणालाही विचारल्यास या हॉटेलचा पत्ता अगदी कुणीही सांगू शकेल.

३) हॉटेल ‘आवारे’ (Hotel ‘Aware’)

हॉटेल आवारे मध्ये आल्यास तुम्हाला शाकाहारी तसेच मांसाहारी असे दोन्ही पदार्थ खायाला मिळू शकतात. सदाशिव पेठेतील ही एक खानावण मटण, चिकनसाठी फेमस आहे. चिकन हंडी, चिकन मसाला थाळी, मटण मसाला थाळी, आळणी मटणकरी थाळी, आळणी मटण थाळी याठिकाणी फेमस आहे. कोल्हापूर पद्धतीने बनविण्यात येणारा तांबडा, पांढरा रस्ता थाळीसोबत दिला जातो. ५०० रूपयांमध्ये याठिकाणी दोघांचा मटण-चिकन खाऊन होतं. या हॉटेलमध्ये २५० रूपयाला थाळी मिळते.

पत्ता:  १५३४, पहिला मजला, अशोकप्लाझा, गरवारे कॉलेजजवळ, कर्वे रोड, पुणे, महाराष्ट्र 411004,

Top 10 Best Non Veg Hotels in Pune
Top 10 Best Non Veg Hotels in Pune

४) हॉटेल मिलन (Milan Hotel)

हॉटेल मिलन  ( Top 10 non veg restaurants in Pune) लोकांची पसंतीत उतरल्याने मिलनच्या अनेक शाखा पुण्यात सुरू झाल्या आहेत. मिलनमध्ये गेल्यास आपल्या आत्मा अतृप्त होतो. याठिकाणी मटण थाळी, चिकन थाळी, सुरमई थाळी, मिलन स्पेशन मटन, चिकन थाळी, मटण चिकण हंडी मिळते. तुम्हाला याठिकाणी भाकरी, चपाती जव्वार, बाजारा, तंदूर रोटी मिळते.विशेष म्हणजे एक व्यक्ती एक थाळी ही अनलिमिटेड खाऊ शकतो. सदाशिव पेठ तसेच पुण्यातील विविध भागात हॉटेल मिलन च्या शाखा आहेत.

पत्ता: १०५६/५७, आपटे रोड, डेक्कन जिमखान्याजवळ, पुणे, महाराष्ट्र

वेळ: दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 Best Non Veg Hotels in Pune
Top 10 Best Non Veg Hotels in Pune

५) हॉटेल स्वराज्य (Hotel Swarajya)

आपल्या परिवारासाठी चिकन-मटण खायचं असेल तर तुम्हाला हॉटेल स्वराज्य सर्वोत्तम हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला २८० पासून पुढे चविष्ट, स्वादिष्ट थाळी मिळतेय. मटण थाळीमध्ये तुम्हाला फ्राईड मटण पासून ते मटणाच्या रस्सा आणि स्वादिष्ट मटण बिर्याणीसह सात प्रकारच्या थाळ्या आहेत. तुम्ही जर सोलापूरचे असाल तर तुम्हाला या हॉटेलमध्ये सोलापूरच्या मटणाची चव आल्याशिवाय राहणार नाही. मी स्वत : अनेकदा या हॉटेलमध्ये गेलो आहे. मन तृप्त झाल्याशिवाय राहत नाही.

पत्ता: १८३, शिवाजी नगर, शिवाजी नगर बस डेपोजवळ, पुणे, महाराष्ट्र 411005

वेळ: दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

      रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 Best Non Veg Hotels in Pune
Top 10 Best Non Veg Hotels in Pune

६) हॉटेल ‘फिश करी राइस’ (Hotel ‘Fish Curry Rice’)

समुद्रातील सर्व पदार्थ आणि विशेष करून कोकणी जेवण तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही बिनधास्त ‘फिश करी राईस’ या हॉटेलमध्ये या. ताजे मासे, फिश थाळी, कोळंबी करी आणि मालवणी शैलीचे मासे या हॉटेलमध्ये मिळतात. सिगनेचर थाळीत तुम्हाला फिश थाळीमध्ये भांगडा, बोंबील, मुदसे, पॉम्पेट, प्रान्स, सुरमई, रवस इत्याही मासे तुम्हाला एकाच थाळीत खायला मिळतात. Pomfret ThalI, Sumai Thali. Prawns Thali, Bangda Thali अशा थाळ्या तुम्हाला या हॉटेलमध्ये मिळतात.

पत्ता :  २, श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, कोथरूड डेपोजवळ, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र 411038,

वेळ: दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

७) सुरवेस पिऊर नॉन व्हेज (Surves Pure Non Veg)

पुण्यातील एप सी रोडवर असलेल्या या हॉटेलमध्ये तुम्हाला मटण खिमा चपाती, मटन फ्राय, मटण आळणी फ्राय, मटण उकड, मटण भजी, मटन रोस्ट, मटन सुक्का फ्राय, असे विविध मटणाचे प्रकार एकाच ठिकाणी मिळतात. यासह मटन करी, मटन दालचा खाना, स्पेशल मटन थाळी, अशा विविध थाळ्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतात.

पत्ता : १, अशोकप्लाझा, १६४, सदाशिव पेठ, मिठीबाई कॉलेजजवळ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०, भारत

वेळ : दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:30 PM

       रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 non veg restaurants in Pune

८) हॉटेल मराठा सम्राट (Hotel Maratha Samrat)

( Top 10 non veg restaurants in Pune) काळं चिकन, चिकन थाळी, मटन थाळी, सी फूट थाळी, अंडा थाळी अशा विविध थाळ्या तुम्हाला अगदी कमी दरात हॉटेल मराठा सम्राट हॉटेलमध्ये मिळतात. हॉटेल शिव सागर पुण्यातील एक लोकप्रिय हॉटेलपैकी हॉटेल शिव सागर आहे. विशेषत उत्तम भारतीय आणि मांसाहारी खाद्यपदार्थासाठी ओळखते जाते. हॉटेल शिवसागरमध्ये आपल्याला विविध प्रकारचे पारंपारिक आणि स्वादिष्ट पदार्थ मिळतात. विशेष करून पंजाबी, मुघलाई, कोल्हापूरी, तंदूरी चिकन, मटण करी अशा थाळ्या याठिकाणी मिळतात.

पत्ता : 660, दुसरा मजला, शंकर शेठ रोड, कमला नेहरू पार्क समोर, पुणे, महाराष्ट्र 411037

वेळ : दुपारचे जेवण: 12:00 PM – 3:00 PM

        रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 non veg restaurants in Pune

९) हॉटेल संदीप (Hotel Sandeep)

अहमदनगर येथील हॉटेल संदीप हे उकडलेलं सुक्क मटण आणि काळ्या मसाल्यात बनविण्यात येणाऱ्या मटनामुळे प्रसिद्ध आहे. संदीप हॉटेलच्या मेन्यूवरील चिकन उकड, चिकन हंडी, चिकन फ्राय, चिकन रोस्ट, मटण हंडी, मटण उकड, मटण फ्राय हे पदार्थ फेमस आहे. येथे २५० पासून थाळी मिळते.

पत्ता : १७/१, बाजीराव रोड, शनिवारवाड्यासमोर, पुणे, महाराष्ट्र ४११०३०

वेळ: दुपारचे जेवण: 11:00 AM – 3:00 PM

        रात्रीचे जेवण: 7:00 PM – 11:00 PM

Top 10 Best Non Veg Hotels in Pune

१०) हॉटेल जगदंबा (शिवापूर): (Hotel Jagdamba (Shivapur)

पुण्याचे सर्वात आवडते चिकन थाळीचे ठिकाण दुसरे तिसरे कोणी नसून हॉटेल जगदंबा आहे. जरी हे ठिकाण पुण्याच्या हद्दीत असले तरी लोक शिवापूरला त्यांची सर्वात स्वादिष्ट चिकन थाळी घेण्यासाठी जातात जे पूर्ण करण्यापेक्षा जास्त आहे कारण त्यांच्या अमर्यादित चिकन थाळीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की काय खावे आणि काय नाही याबद्दल संभ्रम निर्माण होतो. कोणीही कुटुंब आणि शाकाहारी लोकांसह या ठिकाणी भेट देऊ शकता, कारण त्यांच्याकडे शाकाहारी मेनू देखील आहे.

पत्ता : शॉप 3, पुणे बंगलोर हायवे, खेड, शिवापूर

वेळ : दररोज: दुपारी 12:00 ते 4:30

                     संध्याकाळी 7:00 ते 12:00