High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालयात सफाई कामगार पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने शैक्षणिक पात्रता फक्त ७ वी उत्तीर्ण ठेवली आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी ३०० तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कोणतीही फी ठेवण्यात आलेली नाही. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शेवटची तारीख ही २० जानेवारी २०२५ ही ठेवण्यात आली आहे. त्याआधी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी आणि अर्ज मिळवण्यासाठी खाली माहिती दिली आहे. उमेदवारांनी ती माहिती वाचणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी प्रात्यक्षिक परिक्षा, शारिरीक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर रहावे. तसेच नियुक्ती व अलुपसुचीचे सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मूळ शाखा मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे. तसेच सफाई कामगार हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत यांची देखील नोंद घेण्यात यावी असेही जाहिरातीत म्हटले आहे.
एकूण जागा : ०२
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सफाई कामगार (Sweeper) | ०२ |
एकूण | ०२ | |
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : मुंबई
फी : ₹300/-
शैक्षणिक पात्रता : (i) किमान सातवी उत्तीर्ण (ii) संबंधित अनुभव अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जानेवारी २०२५
महत्त्वाच्या लिंक
जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | – |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |