शिंदे गटातल्या ‘४०’ नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी, संपुर्ण यादी पाहा

Eknath Shinde

Eknath Shinde : मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर काही उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज कायम ठेवली आहे. यामुळे मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. उद्यापासून राज्यात प्रचाराचा धुराळाला उडणार आहे. त्याआधी शिवसेना शिंदे गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा…”ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच”, चंद्रकांत पाटलांच्या रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद 

शिवसेना पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार ठाकरेंची साथ सोडली. यातच विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा या 40 आमदारांना निवडून आणण्याची भाषा केली होती. यातील बहुतेक सगळ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर काही जणांचं तिकीट कापण्यात आलं आहे. अशातच राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 87 मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने उमेदवार उभे केले. यात काही मित्र पक्षांना मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी आता उद्यापासून प्रचाराचा धुरा उडणार आहे. यात 40 प्रचारक नेमण्यात आले आहे.

हेही वाचा…विधानसभेसाठी शिंदेंचे उमेदवार ठरले; ४५ उमेवारांची पहिली यादी जाहीर 

शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली यात अनेक जुन्या नेत्यांसह नवीन नेत्यांना संधी देण्यात आले यात एकनाथ शिंदे यांच्या सह रामदास कदम गजानन कीर्तिकर आनंदराव अडसूळ प्रतापराव जाधव गुलाबराव पाटील अशा दिग्गज नेत्यांना नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे यासह काही नवख्या उमेदवारांना देखील स्टार प्रचारकतात कच्ची भूमिका सोपवल्या यामध्ये ज्योती वाघमारे शितल मात्रे राहुल लोंढे अशा अक्षय भोसले यांचा समावेश करण्यात आला

शिवसेना शिंदे गटातील स्टार प्रचारकांची यादी

  1. एकनाथ शिंदे,
  2. रामदास कदम
  3. गजानन कीर्तिकर
  4. आनंदराव अडसूळ
  5. प्रतापराव जाधव
  6. गुलाबराव पाटील
  7. नीलम गोरे
  8. मीनाताई कांबळे
  9. उदय सामंत
  10. शंभूराजे देसाई
  11. दीपक केसरकर
  12. तानाजी सावंत
  13. दादाजी भुसे
  14. संजय राठोड
  15. अब्दुल सत्तार
  16. भरत गोगावले
  17. संजय शिरसाठ
  18. श्रीकांत शिंदे
  19. धैर्यशीलराव माने
  20. नरेश मस्के
  21. श्रीरंग भरणे
  22. मिलिंद देवरा
  23. किरण पावसकर
  24. राहुल शेवाळे
  25. शरद पोंकशे
  26. मनीषा कायंदे
  27. गोविंदा अहुजा
  28. गोपाल तुमने
  29. दीपक सावंत
  30. आनंद जाधव
  31. ज्योती वाघमारे
  32. शितल म्हात्रे
  33. राहुल लोंढे
  34. हेमंत पाटील
  35. हेमंत गोडसे
  36. राजू वाघमारे
  37. मीनाक्षी शिंदे
  38. ज्योती मेहर
  39. अक्षय भोसले
  40. तेजस्विनी केंद्रेRead Also : 

     

    हेही वाचा…चंद्रकांतदादांनी शब्द दिला, म्हणजे तो शंभर टक्के पाळला जाणार 

    हेही वाचा…जरांगे पाटलांनी विधानसभेतून घेतली माघार, राजकीय दबाव होता का ? 

    हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरूड पॅटर्न’ विजयश्रीकडे घेऊन जाणार ? प्रचारात घेतली मोठी आघाडी 

    हेही वाचा…”चंद्रकांतदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व”

    हेही वाचा…अमोल बालवडकरांचा बंड थंड करण्यात भाजप यशस्वी ; चंद्रकांत पाटलांचा विजयाचा मार्ग मोकळा 

कळवणमधून जे.पी.गावित डाव पलटणार; नितीन पवारांना दाखवणार घरचा रस्ता ?

JP Gavit vs Nitin Pawar

JP Gavit : नाशिक : बुधवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत माकपच्या वतीने माजी आ जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कळवण मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून विद्यमान आमदार नितीन पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कळवण मतदारसंघात जे.पी.गावित (JP Gavit) विरूद्ध नितीन पवार अशी लढत निश्चित झाली आहे.

गावित विरूद् पवार अशी सतत लढत

मतदारसंघाची पुनर्नविभागणी झाल्यानंतर याठिकाणी जे.पी. गावित (JP Gavit) विरूद्ध माजी मंत्री अर्जुन पवार यांच्याच अटीतटीची लढत बघायला मिळाली आहे. एक वर्ष जे.पी. गावित तर दुसऱ्या वर्षी अर्जुन पवार यांनी कळवण मतदारसंघावर सत्ता स्थापन केली आहे. परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी ए.टी.पवार यांचं निधनानंतर त्यांचे सुपुत्र नितीन पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडे पुन्हा मतदारसंघ आणला.

मोहन गांगुर्डे यांच्यामुळे गावित यांचा मार्ग मोकळा

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी, माकप आणि शिवसेना अशी लढत झाली. यात शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांना २३,०५२ मत पडल्याने त्याचा फटका जे.पी. गावित यांना बसला. यामुळे नितीन पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. परंतु यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने माघार घेतल्याने मोहन गांगुर्डे यांनी जे.पी. गावित यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे.पी. गावित यांचं पारडं जड मानलं जात आहे.

शरद पवारांचाही पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत जे.पी. गावित (JP Gavit) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शरद पवार यांनी माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तडजोड घडवून आणली होती. मात्र तेव्हा त्यांच्याच बिनसलं होते. परंतु अखेरच्या क्षणी गावित यांनी माघार घेतल्याने शरद पवार गटातील उमेदवार भास्कर भगरे यांचा विजय झाला. एका नवख्या शिक्षकाने एका केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांचा पराभव केला. त्यात जे.पी. गावित यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी जे.पी.गावित यांना विधानसभेसाठी शब्द दिल्याची माहिती आहे.

नितीन पवार पराभावाच्या छायेत

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जे.पी.गावित यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. याचदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत मोर्चा काढला होता. तर अलिकडेच पेसा भरती संदर्भात केलेले आंदोलन राज्यात चर्चेत आले होते. अशातच जे.पी. गावित यांचे सर्व विरोधक एकत्रित आले आहेत. अलिकडेच एका सभेत शेवटची निवडणूक लढवत असल्याचे जे.पी.गावित यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे विरोधक देखील पाठिंबा देतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Read Also : 

हेही वाचा…”ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच”, चंद्रकांत पाटलांच्या रॅलीला जनतेचा उदंड प्रतिसाद 

हेही वाचा…विधानसभेसाठी शिंदेंचे उमेदवार ठरले; ४५ उमेवारांची पहिली यादी जाहीर 

हेही वाचा…मनसेची पहिली यादी जाहीर ; अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात 

हेही वाचा..”महाराष्ट्रात गुलाबी वादळ घोंगवणार”; अजित पवार गटातील स्टार प्रचाराकांची यादी जाहीर 

हेही वाचा…”मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही”, २८८ पैकी १९१ उमेदवार तयार ; महायुतीला थेट चँलेंज