HMPV Virus : कोविडच्या विनाशकारी साथीनं संपुर्ण जग हादरवून सोडलं होतं. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या नव्या व्हायरसमुळे संपुर्ण जग संकटात सापडला आहे. आपल्या शेजारील चीनच्या देशात हा नव्या व्हायरसचा रूग्ण आढळला आहे. अशातच भारतात देखील या नव्या व्हायरसचे रूग्ण आढळले असून केंद्र तसेच राज्य सरकारने देखील याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
कोरोनानंतर आलेल्या या नव्या व्हायरसचं नाव आहे HMVP. म्हणजे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस. (HMPV Virus) या व्हायरसचा पहिला रूग्ण हा २००१ मध्ये नेदरलॅंडसमध्ये सापडला होता. हा एक विषाणू असून एक हंगामी रोग आहे. जो सामान्यत आरएसव्ही आणि फ्लुप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीला उद्धवतो. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सध्या कर्नाटक २, गुजरात १, पश्चिम बंगाल १ आणि तामिळनाडूत २ रूग्ण आढळले आहेत.
या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील नागरिकांना सूचना दिल्या आहेत. आज राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. तसेच HMPV हा विषाणू पुर्वीपासून जगभरात असून या विषाणुमुळे रूग्ण दगावत नसल्याने नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचे आबिटकरांनी स्पष्ट केले आहे. यातच या व्हायरस संदर्भात घ्यावयाची काळजी यासंदर्भात राज्य सरकारने सूचना दिल्या आहते.
ह्युमन मेटान्युमो व्हायरसबाबत ((HMPV Virus)) घ्यावयाची काळजी
- HMPV विषाणू गंभीर नाही, तरी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक
- HMPV व्हायरसवर अद्याप लस नाही
- HMPV विषाणूचा धोका कमी, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये
- केंद्राच्या निर्देशांनुसार आवश्यक उपाययोजना
- सर्दी, खोकला, सौम्य ताप ही या व्हायरसची लक्षणं
- पाच वर्षांखालील सर्वच लहान मुलांना HMPVचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
- ९ महिन्यांच्या आत जन्मलेली बाळं किंवा दमा असलेल्यांना या व्हायरसचा धोका अधिक
- HMPVमुळे जीवाला धोका निर्माण होण्याचं प्रमाण अतिशय कमी; त्यामुळे कोव्हिड-१९ विषाणूशी तुलना नको
- या व्हायरसचं अस्तित्व पहिल्यांदा २००१ साली सिद्ध झाले; मात्र HMPV व्हायरस किमान ५०-७० वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे तज्ञांचे मत
- जगात अनेक ठिकाणी हिवाळ्याच्या दुसऱ्या उत्तरार्धात HMPVचा प्रादुर्भाव वाढतो
काय काळजी घ्याल? (HMPV Virus)
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करु नये? (HMPV Virus)
- हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.