महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला…! विधानसभा निवडणूकीत कोण मारणार बाजी?

Spread love

Maharashtra Legislative Assembly : मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद होणार असून त्यात महाराष्ट्रासह झारखंड राज्यासाठी विधानसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर आजपासून राज्यात कदाचित आचारसंहिता लागू शकते. राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर पार पडलेल्या लोकसभेनंतर आता विधानसभा होत आहे. त्यामुळे या निवडणुकांची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा (Maharashtra Legislative Assembly) वेळापत्रक घोषणा आणि आचारसंहितेची घोषणा होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या निवडणुकांची घोषणा होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर रोजी तर झारखंड राज्याच्या विधानसभेची मुदत ५ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे आचारसंहिता किती दिवसाची असेल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

विधानसभेत कुणाचा बोलबाला ?

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर प्रथमच सहा प्रमुख पक्ष विधानसभेच्या रिंगणात आहेत. लोकसभेत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला. यामध्ये राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर विजय मिळवला तर महायुतीच्या वाट्याला केवळ १७ जागा आल्यात. आता राज्यात २८८ जागांसाठी विधानसभेची (Maharashtra Legislative Assembly) निवडणूक होत आहे. अजून कोणत्याही आघाडीत जागावाटप ठरलेला नाही. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच जागावाटप होणार असल्याचे बोललं जात आहे.

कोणता पक्ष आघाडीत, कोणता पक्ष स्वतंत्र? 

यातच उद्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीत सध्या कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटांसह इतर मित्र पक्ष आहेत. तर महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह इतर मित्र पक्ष देखील आहेत. यासह राज्यात या दोन आघाड्यांसह परिवर्तन महाशक्ती म्हणून तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजी राजे भोसले आहेत. तर मनसे आणि वंचित हे स्वतंत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

कोण मारणार बाजी ? 

यातच मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. सुरूवातीला विधानसभा निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. मात्र त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार आणि कॉंग्रेस विरोध केला होता. दुसऱ्या बाजूला महायुतीत मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात येईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


Spread love

Leave a Comment